कणकवली येथे
आज शोकसभा
कणकवलीः माजी आमदार, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. य. बा. दळवी यांचे १७ ऑगस्टला निधन झाले. मूठ कळसुली येथील डॉ. दळवी यांनी रुणांना खूप मोठी सेवा दिली. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या (ता. २२) सायंकाळी ४ वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हावासियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
......................
सासोली कॉजवेचा
भाग कोसळला
दोडामार्गः सासोली-भटवाडी येथील रामचंद्र भाटवाडेकर यांच्या घराशेजारील कॉजवेचा काही भाग कोसळला. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कॉजवे कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वेळीच ग्रामपंचायत ब महसूल विमागाने याकडे लक्ष देऊन होणारी दु्र्घटना थांबवावी, असे मनोहर भाटवाडेकर यांनी म्हटले आहे. भाटवाडेकर यांच्या घराशेजारी ग्रामपंचायतीचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरील कॉजवेचा काही भाग १४ ऑगस्टला कोसळला. कोसळलेल्या भागातून पावसाचे पाणी झिरपत असल्याने अजून त्या ठिकाणचे दगड, माती कोसळू शकते. त्यामुळे तत्काळ ग्रामपंचायतीने लक्ष देऊन त्या ठिकाणी दुरुस्ती करावी, अशी मागणी भाटवाडेकर यांनी केली आहे.
......................
देवसू येथे आज
''फार्मर आयडी''
सावंतवाडीः शेतकऱ्यांनी स्वतःचा फार्मर आयडी तयार करावा. तसेच ई-पीक दाणोली, देवसू व सातुळी या महसुली गावांतील पलीकडचीवाडी येथे उद्या (ता. २२) सायंकाळी ३ ते ५ या वेळेत अँग्रीस्टॅक फार्मर आयडी तयार करणे व ई-पीक पाहणीबाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शेतकऱ्यांनी स्वतःचा फार्मर आयडी तयार करावा तसेच ई-पीक पाहणीबाबत माहिती करून घ्यावी. शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.
.........................
आपत्ती व्यवस्थापनाचे
जानवलीत आज धडे
कणकवलीः जानवली-बुद्धविहारच्या सभागृहात उद्या (ता. २२) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग राष्ट्रीय आपत्ती दलाचे टीम कमांडर श्री. यादव नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळ अधिकारी योजना सापळे, ग्राम महसूल अधिकारी दत्ता डाके यांनी केले आहे. प्रशिक्षणामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये जोखीम कमी करणे, आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठीची पूर्वतयारी, मदत आणि बचावकार्य कसे करावे, बाधित लोकांना मदत आणि जनजीवन पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न, जखमींना प्रथम उपचार, आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय सहभाग आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
.........................
महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी
नऊ जणांकडून रक्तदान
सावंतवाडीः सांगेली येथील समिधा सांगेलकर या महिलेवर बायपास शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी नऊ रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यांच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी ‘बी पॉझिटिव्ह’च्या रक्तदात्यांची गरज होती. युवा विकास प्रतिष्ठान सांगेली आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गच्या सदस्यांनी तत्काळ प्रतिसाद देत जोरदार पाऊस असूनही या रक्तदात्यांनी गोवा येथे जाऊन रक्तदान केले. यात नितीन राऊळ, अभिजित कविटकर, सत्यवान मेस्त्री, अमित मेस्त्री, उमा वराडकर, बबन कोचरेकर, यश कदम, मंगेश माणगावकर, पियुष सांगेलकर यांचा समावेश होता. या रक्तदात्यांचे ''ऑन कॉल'' संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.