कोकण

भूमिगत विद्युत वाहिनी कामाचा देवगडात शुभारंभ

CD

86435

भूमिगत विद्युत वाहिनी
कामाचा देवगडात प्रारंभ
पालकमंत्र्यांची उपस्थिती ः खबरदारीने काम करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ : येथील शहरातील भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाला. नागरिकांची अडचण टाळण्यासाठी गणेशोत्सवानंतर कामाला सुरुवात करा, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. खोदाई करताना कुठलीही वायर तुटणार नाही, शहराची संपर्क यंत्रणा कोलमडणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
येथील बसस्थानकासमोर भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन झाले त्यावेळी श्री. राणे यांनी प्रशासनाला आवश्यक सूचनाही केल्या. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, सदाशिव ओगले, बाळ खडपे, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, तहसीलदार आर. जे. पवार, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल लिमकर, सहायक अभियंता छाया परब, एनसीआरएमपीचे प्रकल्प व्यवस्थापक भीमराव घाटुळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील खाडीकिनारची सुमारे ९ किलोमीटर अंतराची उच्चदाब वीज वाहिनी, तर सुमारे १२ किलोमीटर अंतराची लघुदाब वीज वाहिनी भूमिगत गेली जाणार आहे. त्यामुळे खाडीकिनारच्या भागातील वीज समस्यांची सोडवणूक होईल.
महावितरणचे श्री. लिमकर यांनी याबाबत माहिती दिली. श्री. राणे यांनी, आता गणेशोत्सव तोंडावर असल्याने प्रत्यक्ष कामाला उत्सवानंतर सुरुवात करण्यात यावी. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यात यावे. खोदाई करताना शहरातील बीएसएनएल संपर्क यंत्रणा कोलमडून जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Hashmi: इमरान हाशमीचा ठाकरे गटात प्रवेश! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना झटका, मिरा भाईंदरवर लक्ष!

Nashik Accident : भीषण! नाशिक-गुजरात महामार्गावर कार-ट्रकची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Kolhapur Fraud Tantrik : कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर..., चुटकी वाजवून भूतबाधा करणाऱ्या मांत्रिकाचा कारनामा उघड; जिल्ह्यावर वचक ठेवायचां प्रयत्न...

Type 5 Diabetes Global Recognition: मधुमेहाच्या नव्या प्रकार; ‘टाइप ५’ मधुमेहाला आता जगभर अधिकृत मान्यता

राग, निराशा अन्‌ हतबलता वाढतेय! ISL सुरू करण्यासाठी भारतीय फुटबॉलपटूंची आर्त हाक...

SCROLL FOR NEXT