कोकण

गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठांचा सन्मान

CD

गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठांचा सन्मान
रत्नागिरी ः नाभिक समाज हितवर्धक मंडळच्यावतीने विठ्ठलमंदिरात संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आले. या वेळी तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने बाजारातून पालखी दिंडी काढण्यात आली. त्यानंतर राधाकृष्ण मंदिर येथे समाजबांधवांची सभा झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. संध्याकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत मंदिरात भजन झाले. ७ वाजता उत्तरपूजेनंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

कोळकेवाडीत मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिर
चिपळूण : ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये खरा आनंद आणि परमार्थ मिळतो, असे प्रतिपादन आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्ट चिपळूणच्या अध्यक्षा डॉ. वर्षा कुडचडकर यांनी केले. जांभराई चौथा टप्पा परिसरातील कोळकेवाडी येथे प्रयोगभूमी शिक्षणकेंद्र आणि आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर झाले. या वेळी चंद्रशेखर कुडचडकर, संचित कुडचडकर, श्रुती हळदणकर, सागर खोडदे, आकांक्षा खोडदे, सचिन वाशीवाले, प्रियंका वाशीवाले, संदीप शिवगण, नीतेश खाडे आदी उपस्थित होते. शिबिरात डॉ. कुडचडकर यांनी आयुर्वेदाच्या सुमारे ३ हजार वर्षांच्या व्यापक आणि सखोल परंपरेविषयी मार्गदर्शन केले. तसेच हर्बल कायरोप्रॅक्टिक उपचारांबाबत माहिती दिली. शिबिरात रक्तगट तपासणी, टीटी इंजेक्शनसारख्या तपासण्या मोफत केल्या गेल्या. विविध रोगांवर उपचार, मार्गदर्शन आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिरानंतर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचा परिसरातील सुमारे ५० ते ५५ रुग्णांनी लाभ घेतला.


डॉ. अमेय गोडबोलेंना भारत श्री पुरस्कार
चिपळूण ः मध्यप्रदेश सरकारच्यावतीने दरवर्षी भारत श्री पुरस्काराचे आयोजन केले जाते. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींची निवड केली जाते. शिक्षणक्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल येथील डॉ. अमेय गोडबोले यांचा भारत श्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कारासाठी सुरवातीस निवड झालेल्या व्यक्तींची सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. या पडताळणीनंतर सर्व व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीमधून उत्तम व्यक्ती पुरस्कारासाठी निवडल्या जातात. यावर्षी पहिल्या फेरीला ३०० पेक्षा जास्त लोकांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीमध्ये केवळ ४१ लोकांना निवडण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलचे यश
चिपळूण ः आई आधार केंद्र व पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे आयोजित (कै.) पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा ओणी येथील नूतन विद्यालयात झाली. स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या स्वराज कदम याने द्वितीय आणि स्वरांगी जोशी हिनेही (८वी ते १०वी गट) द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, प्रशस्तिपत्रक आणि रोख २,५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत लहान गटातून २९ तर मोठ्या गटातून ३४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या यशाबद्दल मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका रेवती कारदगे तसेच संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

-rat२३p१०.jpg-
२५N८६५२६
पावस ः नाखरे शाळेत श्रावणधारा कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी.

नाखरे शाळेत श्रावणधारा
पावस ः स्थानिक लोककला आणि संस्कृती यांचे जतन होण्याच्यादृष्टीने रत्नागिरी तालुक्यातील नाखरे शाळेत श्रावणधारा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाची सुरवात श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या कवितेने सातवीच्या विद्यार्थ्यांनी केली. सृष्टीपूजनानिमित्ताने भक्तीमय आरती करून अंगणवाडी सेविका मंगला चव्हाण यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. पारंपरिक वेशभूषा करून मुलींनी टिपरीनृत्य, गौरी-गणपतीची गाणी, फुगडी, मंगळागौर खेळ, उखाणे यांचे उत्साहात सादरीकरण केले. कोकणातील प्रसिद्ध जाखडीनृत्याचा फेरही धरला. शेवटी मुख्याध्यापक राजेंद्र भिंगार्डे यांनी पोषक आहाराविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. मुलांना चणे, चुरमुरे देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT