कोकण

जुगार अड्ड्यासाठीची ''ती'' झोपडी उद्ध्वस्त

CD

86597
86598
86599

जुगार अड्ड्यासाठीची ‘ती’ झोपडी उद्ध्वस्त
पोलिसांकडून कारवाईः ‘सकाळ’च्या वृत्तानंतर यंत्रणेला जाग
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः शहरातील नरेंद्र डोंगरावरील जुगार अड्ड्याबाबत ‘सकाळ’ने वस्तुस्थिती समोर आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या येथील पोलिस यंत्रणेने संबंधित जुगार अड्ड्यासासाठी बांधलेली झोपडी उद्ध्वस्त केली. याआधी स्थानिकांनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नव्हती. आता जुगार अड्डा उद्ध्वस्त झाल्यामुळे ‘सकाळ’च्या वृत्ताबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
सावंतवाडी नरेंद्र डोंगरावर अनधिकृतरित्या झोपडी उभारून गेली कित्येक वर्षे रात्री बारानंतर जुगार खेळला जात होता. लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी एका रात्रीत होत होती. गोव्यासारख्या भागातून लोक येथे खेळण्यासाठी येत असत. येणाऱ्या सर्वांची जेवण्याची व दारूची सोयही येथे केली जात होती. एवढा मोठा जुगार अड्डा सुरू असताना आणि त्याबाबत तक्रारी असताना पोलिस यंत्रणा याकडे कारवाईच्या भूमिकेतून कधीच पाहत नव्हती. जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी नुकतीच कणकवली येथे मटका बुकीवर स्वतः धाड टाकत जिल्हा पोलिस यंत्रणेची निष्क्रियता समोर आणली. त्यानंतर जिल्हा पोलिस यंत्रणा कमालीची धास्तावली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने नरेंद्र डोंगरावरील जुगाराचे वृत्त प्रसिद्ध करत पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची वस्तुस्थिती समोर आणली. या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या सावंतवाडी पोलिसांनी तत्काळ या जुगार अड्डयाच्या ठिकाणी जात ती झोपडी उद्ध्वस्त केली; मात्र ‘सकाळ’ने पुन्हा तेथे जाऊन वस्तुस्थिती पाहिली असता, ती झोपडी मुळासकट उद्ध्वस्त होणे गरजेचे आहे. ही कारवाई केवळ दिखाव्याची भूमिका होती का, असेही लक्षात आले. कारण असलेल्या झोपडीच्या सांगाड्यावर पुन्हा छत टाकून तेथे पुन्हा जुगार सुरू होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. त्यामुळे पुन्हा तेथे जुगार सुरू होऊन नये, यासाठी स्थानिक पोलिसांसह अधीक्षकांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.
मुळात अनेक वर्षांपासून हा सुरू असलेल्या या जुगार अड्ड्याबाबत सावंतवाडी पोलिस ठाणेच नव्हे, तर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सुद्धा वेळोवेळी विविध नागरिकांनी लेखी तक्रारी केल्या होत्या; मात्र त्या अड्ड्यावर कारवाई करण्याची हिंमत पोलिस यंत्रणेने दाखवली नाही, असे नागरिकांचे म्हणणे होते. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. त्यामुळे यामध्ये पोलिस यंत्रणा सुध्दा सामील होती का, असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे,
ज्या ठिकाणी हा जुगार अड्डा सुरू आहे, त्या भागात सकाळच्या प्रहरी फेरफटका मारण्यासाठी शहरातील काही नागरिक जात असतात; मात्र त्याच दरम्यान या भागातून मद्यधुंद अवस्थेत काही माणसे बाहेर पडत असतात, असे नागरिकांनी सांगितले. या संदर्भातही वेळोवेळी आवाज उठवण्यात आला; मात्र कोणीच कारवाईसाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे ‘सकाळ’ने आज प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर शहरातील बऱ्याच सुशिक्षित नागरिकांनी आभार व्यक्त केले.

चौकट
बेकायदेशीर वीज जोडणी
हा जुगार अड्डा खोलगट भागात अडगळीच्या ठिकाणी असून तेथे जाण्यासाठी निमुळती वाट आहे. नरेंद्र डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यापासून आत दीडशे मीटर हा अड्डा आहे. या रस्त्यावर काही ठराविक अंतरावर विद्युत लाईन जोडून बल्ब बसविले आहेत. रात्रीच्या वेळी जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांना सोईचे व्हावे, म्हणून हा सर्व व्याप केला आहे; मात्र हे विद्युत कनेक्शन नेमके कुठून आले, हे दिसून येत नाही. जवळूनच वीज वितरणची विद्युत लाईन जाते, त्यावरून कदाचित ही वीज चोरी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे वीज वितरणने याची खात्री करणे आवश्यक आहे.

चौकट
जुगाराचा अड्डा समूळ नष्ट करा
पोलिस यंत्रणेने झोपडी मुळासकट उखडून न टाकता केवळ कारवाई केल्याने खरोखरच पोलिसही यात दाबली गेली आहे का, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येतो. अनधिकृत अड्डा उद्ध्वस्त झालाच पाहिजे, शिवाय पुन्हा जुगार सुरू होऊ नये, याची दखलही केवळ स्थानिक पोलिस यंत्रणेने नव्हे तर जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही घ्यावी, अशी मागणी होत आहे.

चौकट
पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक
पालकमंत्री नीतेश राणे यांनी घेतलेली भूमिका आणि ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित जुगार चालकाला काही दिवस शांत राहण्याची सुचना केल्याचे पुढे आले आहे. गणेश चतुर्थी काळात हा जुगार पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आहेत. संबंधित जुगार चालक गणेश चतुर्थीमध्ये भर वस्तीत एका धार्मिक स्थळाच्या बाहेर जुगार चालवतो, अशीही चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी आता अशा कृत्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT