swt2712.jpg
87460
प्राजक्त चव्हाण
गृहोपयोगी संच वितरणबाबत
सुधारित कार्यपद्धती जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदणीकृत सक्रीय बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तू संचाबाबत सुधारित कार्यपद्धती जाहीर केली आहे, अशी माहिती श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली.
पत्रकात म्हटले आहे की, बांधकाम कामगाराने देय असलेले स्वयं-घोषणापत्र संगणक प्रणालीमध्येच तयार होणार असल्याने ते स्वतंत्रपणे भरण्याची गरज राहणार नाही. कामगाराने ऑनलाईन अर्ज सादर करून निश्चित भेट दिनांक (अपॉईंटमेंट) व वितरण केंद्र निवडता येणार आहे. अर्ज करताना नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल व त्या आधारे दिनांक व केंद्राची निवड करता येईल. प्रत्येक वितरण केंद्राची प्रतिदिन क्षमता २५० ऐवजी ५०० करण्यात आली असून, सर्व केंद्रांकरिता ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत (शासकीय सुट्ट्या वगळून) वितरणाचे दिनांक खुले ठेवण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार ही मुदत वाढविण्यात येईल.
गृहपयोगी संच मिळण्यासाठी बांधकाम कामगाराच्या संकेतस्थळावरील फोटो व ओळखपत्र/आधारकार्डवरील फोटो एकसमान असणे बंधनकारक आहे. अर्ज स्वीकृतीनंतर कामगाराचे बोटांचे ठसे व ऑनलाईन छायाचित्र घेऊन संच सुपूर्द करण्यात येईल. हा गृहोपयोगी संच पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही एजंटांना यासाठी पैसे देऊ नयेत. जर कोणी पैसे मागत असल्यास त्वरित संघटनेशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.