कोकण

क्राइम

CD

हातभट्टी दारू विकणाऱ्या
महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड येथील कोलते स्टॉप-चिरेखाण येथे तात्पुरत्या बांधलेल्या झोपड्यात विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४२० रुपयांची चार लिटर गावठी दारु पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ३०) रात्री पावणेदहाच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वृद्धाचा अकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः चक्कर येऊन पडलेल्या वृद्धाला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रकाश शंकर खाडे (वय ६०, रा. टेंभे, सध्या हातीस, पो. तोणदे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश खाडे हे शुक्रवारी (ता. २९) रात्री अकराच्या सुमारास बाथरुमला जात असताना चक्कर येऊन पडले. हे जयवंत धोंडून नागवेकर यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीस्वारावर पडली
झाडाची फांदी
चिपळूण : शहरात दादा कारेकर यांच्या इमारतीसमोर झाडाची फांदी एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडली. या अपघातामध्ये मोटरसायकलस्वार किरकोळ जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. या घटनांनंतर मोटररायकलस्वार आनंदा कारेकर तिथून निघून गेला. मात्र बघणाऱ्या लोकांची तेथे गर्दी जमा झाली. छाया फोटो स्टुडिओ समोर सकाळी ११ वाजता हा अपघात झाला. या अपघातानंतर शहरातील धोकादायक फाद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha reservation GR: ओबीसींना फायदा नाही, SC ST ला खड्यात घालण्याच काम... विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

अल्पवयीन मुलांना डिप्रेशनमधून बाहेर काढणार एआय; OpenAI कडून मोठी घोषणा, कसं वापरायचं, जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : छगन भुजबळ नाराज? मंत्रिमंडळाच्या बैठकीला मारली दांडी

Shambhuraj Desai: अहिल्यादेवींचे स्मारक आत्मगौरवाचे प्रतीक: पालकमंत्री शंभूराज देसाई; 'धनगर समाजाच्या मागण्या अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या'

Pune News : कारवाईच्या धसक्याने पाणीमीटर; महिन्यात बसविले ३,६०० मीटर, गुन्हे दाखल नाहीत, मात्र नोटीस बजावण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT