कोकण

भगवतीनगर येथे फलक

CD

आप्पा भोसले यांच
भगवतीनगर येथे फलक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः तालुक्यातील भगवतीनगर येथील मुख्य बाजारपेठेमध्ये समाजसेवक कै. पांडुरंग तथा आप्पा भोसले यांच्या फलकाचे अनावरण उद्योजक रवीशेठ राजवाडकर यांचे हस्ते झाले.
कै. पांडुरंग उर्फ आप्पा भोसले यांनी स्वातंत्र्योत्तर काळानंतर अनेक वर्षे सरपंचपद भूषवले होते. तीन ते चार दशके ते ग्रामपंचायत सदस्य होते. या कार्यकाळात त्यांनी गावच्या विकासाचे काम केले. पूर्वी निवेंडी भगवतीनगर हा एकच गाव असताना प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर रस्ते व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आप्पांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे ४० ते ५० वर्षांपूर्वीपासून गावात एक गाव एक स्मशान भूमी हा एक महत्वाचा सामाजिक बदल घडवणारा उपक्रम सुरू करण्यात आला. आप्पांच्या या कार्याचे स्मरण व गौरव म्हणून गावातील मध्यवर्ती ठिकाणी त्यांच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सरपंच प्रगती भोसले, शंकर आंबेकर, सतीश सोबळकर, प्रकाश भोसले, प्रमोद भोसले, वैभव घाग, शेखर सावंत, सुनील वाडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT