- rat३p११.jpg-
२५N८९१८८
रत्नागिरी ः मांडवी किनारी गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करताना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
भाजपतर्फे मांडवीत गणरायांवर पुष्पवृष्टी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः भारतीय जनता पार्टीतर्फे गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. काल (ता. २) झालेल्या गणपती विसर्जनात मांडवी येथे पुष्पवृष्टी करण्यात आली.
रत्नागिरी शहरातील मांडवी चौपाटी येथे भुतेनाक्यावर पुष्पवृष्टीसाठी शामियाना उभारण्यात आला होता. मिरवणुकीतील हजारो श्री गणरायांचे व भक्तगणांचे पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले. सायंकाळी ४ ते रात्री १० वाजपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रत्नागिरीतील पहिल्या मानाच्या लाल गणपतीने विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. मिरवणुकीवेळी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यातही भक्तगणांचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. या उपक्रमामुळे सर्वस्तरांतून भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले. भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांच्या प्रेरणेने जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्यावतीने चंद्रशेखर निमकर, अशोक वाडेकर यांच्या नियोजनातून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महेंद्र मयेकर, राजन पटवर्धन, राजन फाळके, नीलेश आखाडे, मनोज पाटणकर, ओंकार फडके, मंदार भोळे, पमू पाटील, विक्रांत जैन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.