कोकण

पारावर गणपतीचे मखर बनवताना दिला आनंद

CD

- rat४p१६.jpg-
२५N८९४११
आरास आणि सजावटीचे काम करताना कलाकार.
---
पारावर गणपतीचे मखर बनवताना दिला आनंद...

टिळक आळी गणेशोत्सवात सर्वांना बरोबर घेऊन काम करावयाचे असते, याचे धडे मिळाले तेव्हा श्री गजाननाने विविध प्रकारची आरास आणि सजावट करण्यासाठी शक्ती आणि प्रेरणा दिली. येथे वैविध्यपूर्ण सजावट आणि आरास करण्याची नवीन परंपरा निर्माण करणारे प्रकाश आणि विलास कुळकर्णी या बंधूंपैकी विलास यांनी शताब्दीनिमित्त त्यांच्या कलाकृतीमागील प्रेरणांचा केलेली नोंद.
- विलास कुळकर्णी
---------------
सुमारे १९६७-६८चा काळ. उत्सवाचे कामकाज सुरू होते. उत्सवातील कार्यक्रमांसाठी बांधावयाच्या रंगमंचाच्या कामात मदत करणे सुरू केले. त्यानंतर हळूहळू उत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्‍या इतर कामांचीही आवड निर्माण होऊन श्री गणपतीची आरास बनवण्याच्या कामांत मदत करू लगलो. या कामी त्या वेळचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. चितूतात्या जोशी, कै. गजाभाऊ जोशी, कै. विजय केतकर, कै. विनायक मुसळे, कै. विजय खेर तसेच ग. ल. खेर, मुरलीधर कोल्हटकर, परशुराम केळकर अशा अनेकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत गेले.
सुरुवातीला गणेशाची आरास करण्यासाठी लाकडी फ्रेम (काचा असलेली) कै. नंदू परांजपे यांच्याकडून आणून ती स्वच्छ करून सजवण्याच्या कामी मदत सुरू केली. काही कालावधीनंतर ज्येष्ठ बंधू प्रकाश कुळकर्णी यांच्या कल्पकतेतून त्या फ्रेमच्या काचा काढून आकर्षक पद्धतीने सजावट करणे सुरू झाले. मध्यंतरी चांदोबा मासिकामधील पौराणिक कथेतील पुष्पक विमानाची संकल्पना मनात धरून तसा देखावा (मखर) सहकाऱ्‍यांच्या मदतीने साकारला. हा मखर सजावटीतील पहिला बदल. त्यानंतर उत्सवातील करमणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यास सुरुवात झाली.
साधारणपणे १९८६ पासून माझे बंधू प्रकाश कुळकर्णी यांच्या कल्पकतेतून व पुढाकाराने गणेशोत्सवांमध्ये भव्य स्वरूपात देखावे (आरास किंवा मखर) करण्यास सुरुवात झाली. दरवर्षी साकारलेले मखर, विसर्जन मिरवणुकीमध्ये गाड्यांवरून नेल्याने ते लोकांच्या नजरेत आले. यासाठी गाड्याची व्यवस्था म्हणजे चासीस माझे लहान बंधू माधव कुळकर्णी यांच्यामार्फत देवस्थानास मिळाली.
शतक महोत्सवाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा नवीन प्रकारे सजावट, देखावा, आरास करू. या सहकाऱ्यांच्या आग्रहाने आम्ही बंधूद्वय आता सत्तरीच्या पुढे असूनही आम्हाला आनंद मिळतो म्हणून शतकोत्सवी गणेशोत्सवाच्या सजावटीची जबाबदारी घेतली. सहकाऱ्यांमुळे पर्यावरणपूरक मंदिराची उभारणी केली आहे. रत्नागिरीमधील असंख्य नागरिक टिळक आळीच्या श्रीगणेशाचे दर्शन घेताना मखराची सर्वत्र प्रशंसाही होत आहे, हे आम्हा सर्वांचे भाग्य आहे असे मी मानतो. आमच्या पुढील पिढीने शतकोत्तर कालावधीमध्ये नवनवीन सजावटीने श्रीगणेशाची आरास करावी. गणेशोत्सव मंडळाने लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामागची मुख्य विचारपरंपरा लक्षात घेऊन सामाजिक, धार्मिक उपक्रम अधिकाधिक राबवावेत. कारण, दिवसेंदिवस ही काळाची गरज आहे.
----
चौकट
मंडळाला विविध पारितोषिके
उत्सवाचे ६०, ७५ व आत्ताचा शतक महोत्सव हे मैलाचे दगड ठरले आहेत. ७५च्या सुवर्ण महोत्सवाचे कार्याध्यक्ष अरूअप्पा जोशी यांची प्रकर्षाने आठवण येते. त्या वेळच्या एकूण सजावटीसाठी त्यांनी ‘परमोच्च सजावट’ अशी वाहवा केली होती. विविध देखाव्यांसाठी (सजावटीसाठी) बरेचवेळा मंडळास निरनिराळी पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी विदर्भात बैठक

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT