- rat४p२९.jpg-
२५N८९४६४
पावस ः येथील नाटेश्वर मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा विठ्ठल रखुमाई संघ चषक स्वीकारताना.
‘विठ्ठल रखुमाई’ने पटकावला नाटेश्वर चषक
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ४ ः श्री देव नाटेश्वर मंडळ, गावडे आंबेरे येथे आयोजित गणेशोत्सवानिमित्त अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पूर्णगड येथील विठ्ठल रखुमाई संघाने पटकावले.
गावडे आंबेरे येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत चुरशीच्या अंतिम सामन्यात डोर्लेकरवाडी संघाने ६ चेंडू २६ धावांचे आवाहन विठ्ठल रखुमाई संघासमोर ठेवले होते. हे आव्हान विठ्ठल रखुमाई संघाकडून फलंदाज युगल डोर्लेकर व प्रणव वाघे या जोडीने ५ चेंडू राखून पूर्ण केले. या स्पर्धेचे विजेतेपद विठ्ठल रखुमाई संघाने पटकावले असून, सिया स्पोर्ट्स डोर्लेकरवाडी संघ उपविजयी ठरला. स्पर्धेचा मालिकावीर सन्मान प्रज्योत आडविलकरने (सिया स्पोर्ट्स) पटकावला. उत्कृष्ट फलंदाज युगल डोर्लेकर (श्री विठ्ठल रखुमाई), उत्कृष्ट गोलंदाज आर्यन डोर्लेकर व ओंकार वाघे (श्री विठ्ठल रखुमाई) तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रज्योत आडविलकर (सिया स्पोर्ट्स) यांची निवड करण्यात आली. शिस्तबद्ध संघाचा मान मोमीन स्पोर्ट्सला (गावखडी) देण्यात आला. उत्कृष्ट समालोचक म्हणून अर्णव वासावे याची निवड झाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नरेंद्र नाटेकर, मनोहर नाटेकर, विलास नाटेकर, भरत नाटेकर, अनिल नाटेकर, वासुदेव नाटेकर यांच्या उपस्थितीत झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.