कोकण

वामन द्वादशीला १,७०२ बाप्पांना निरोप

CD

वामनद्वादशीला विसर्जनाची लगबग
जिल्ह्यात १७०२ गणरायांना निरोप ; पोलिस बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः जिल्ह्यात गणेशोत्सवातील वामनद्वादशीच्या दिवशी १ हजार ७०२ खासगी तर ५ सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात आला. शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरातील कर्ला-आंबेशत, खालची आळी, नाचणे तसेच शहराजवळील बसणी, काळबादेवी, कोतवडे येथील तर जिल्ह्यातील १ हजार ७०२ गणपतींचे तर ५ सार्वजनिक गणपतींचे उत्साहात विसर्जन झाले. जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्रकिनारी अथवा पाणवठ्यावर गणपतींचे विसर्जन झाले. येथील भाट्ये आणि मांडवीकिनारी सायंकाळी चार वाजल्यापासून गणेशभक्तांची वर्दळ वाढली होती. गुरूवारी सकाळी पावसाने चांगल्या प्रकारे वर्णी लावली होती; मात्र दुपारनंतर पावसाने काही उसंत घेतल्यामुळे गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत झाला होता. गर्दी टाळण्यासाठी गणेशभक्तांनीही या वेळी गणपती विसर्जनाला लवकर सुरुवात केली होती. सायंकाळी मांडवी किनारी गणेशभक्तांची ये-जा सुरू झाली होती. पोलिसांचा बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाला कमी गर्दी होती. गौरी गणपती विसर्जनाला शहरात तसेच ग्रामीण भागात समुद्रकिनारी व पाणवठ्यावर लोकांची गर्दी पाहायला मिळाली होती; मात्र गणेश विसर्जन शांततेत झाले. वामन द्वादशीलाही रस्त्याने जाणारे भक्त ढोलताशाच्या गजरात विसर्जनाला शांततेत व शिस्तीत मांडवी-भाट्येकिनारी येत असल्याचे दिसत होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागोजागी पथक तयार ठेवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी विदर्भात बैठक

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT