कोकण

कोकमच्या प्रक्रियेतून बदलले अर्थकारण

CD

लोगो -
बलशाली नारीशक्ती
खारेपाटणः भाग दोन

swt95.jpg व swt96.jpg
90358, 90359
खारेपाटण : कोकमवर प्रक्रिया करून उत्पादने बनविताना समर्थ कृपा स्वयंसहायता समुहाच्या महिला.
swt97.jpg, swt98.jpg, swt99.jpg
90360, 90361, 90362
कोकमपासून बनविलेली उत्पादने.

कोकमच्या प्रक्रियेतून बदलले अर्थकारण
खारेपाटणमधील यशोगाथाः समर्थ कृपा समूह मिळवतोय वर्षाला ८ लाखांचा नफा
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ः कोकम हे फळ उत्पादन विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लाभलेले वरदान आहे; मात्र ते केवळ आगळ आणि जेवणात वापरण्यापुरते मर्यादित होते. आता या कोकमपासून अनेक खाद्य पदार्थ बनविता येतात, विविध उत्पादने घेता येतात, हे दाखवून दिले आहे कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील श्री समर्थ कृपा स्वयंसहायता समुहाने. कोकमपासून कोकम, आगळ, सरबत, बटर आणि पेंडीपासून खत अशी विविध उत्पादने हा समूह तयार करीत आहे. विशेष म्हणजे वर्षाला आठ लाख रुपये एवढा नफा मिळवीत आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेल्या महिलांच्या बचतगट समुहांनी विविध उत्पादने घेत राज्यात लक्षवेधी काम करण्यास सुरुवात केली आहे. कॉर्पोरेट विश्वाप्रमाणे वाटचाल सुरू केली आहे. नैसर्गिकरित्या उत्पादित होणाऱ्या स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले आहेत. काही वर्षांपूर्वी निसर्गनिर्मित मिळणारी उत्पादने फक्त घरापर्यंत आणली जात होती, नंतर ही फळे दलाल विकत घेऊन त्याचा खरा फायदा घेत होते; परंतु महिलांनी हा वारसा मोडला आहे. मिळणारे फळ उत्पादन बाजारात विक्री न करता त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग महिलांनी आत्मसात केले आहेत. त्यातीलच एक महिला समूह म्हणजे खारेपाटण येथील श्री समर्थ कृपा स्वयंसहायता समूह होय.
ग्रामीण भागातील गरीब, गरजू, वंचित, घटस्फोटीत विधवा अशा महिलांचे स्वयंसहायता समूह तयार करणे, त्या समुहांना दशसूत्रीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, महिलांना बचतीची सवय लावणे अंतर्गत कर्ज वितरण करणे, या उद्देशाने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या श्री समर्थ कृपा स्वयंसहायता समुहाने गेल्या नऊ वर्षांत मोठी व्यावसायिक घोडदौड केली आहे. खारेपाटण गावातील १० महिलांनी ५ डिसेंबर २०१७ ला श्री समर्थ कृपा स्वामी स्वयंसहायता समुहाची स्थापना केली होती. या महिलांनी बचतीच्या माध्यमातून चालवलेल्या या समुहाला दशसूत्रीच्या आधारे पुढे वाटचाल सुरू केली आहे.
हा समूह गेली नऊ वर्षे नियमित कार्यरत असून दर आठवड्याला बैठक घेतली जाते. दोन वेळा बँक कर्ज उचल केली आहे. त्याची नियमित परतफेड सुध्दा केली आहे. त्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत बीज भांडवल निधी मिळालेला आहे. या महिलांचा ग्रामसभेमध्ये नियमित सहभाग असतो. कोकमपासून उत्पादने तयार करणे, हा व्यवसाय या महिला करतात. समुहाने अंतर्गत कर्जावरील व्याज, व्यवसायातील नफा, शासकीय निधी यांच्या जोरावर आर्थिक वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. अभियानाकडून ३० हजार एवढा फिरता निधी मिळाला आहे. तसेच ६० हजार रुपये एवढा समुदाय गुंतवणूक निधी मिळाला आहे. बीज भांडवल ४ लाख रुपये मिळालेले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व ''सिंधुरत्न'' या योजनेअंतर्गत १८ लाख रुपये निधी मिळाला आहे.
या निधीतून त्यांनी मिनी रिफायनरी ऑईल मशीन बसवले आहे. या मशिनच्या माध्यमातून कोकमपासून कोकम, आगळ, सरबत, बटर आणि पेंडीपासून खत अशी विविध उत्पादने तयार केली जातात. कोकम उत्पादनातून मागील दोन वर्षांत प्रतिवर्षी या समुहाला आठ लाख रुपये एवढा नफा प्राप्त झालेला आहे. त्यासाठी आवश्यक असणारा कच्चामाल म्हणजेच कोकम व कोकम बी गावातून तसेच इतर ग्रामीण भागातून खरेदी केला जातो. अशा पद्धतीने व्यवसाय करत गेली नऊ वर्षे आपली घोडदौड कायम ठेवत यश संपादन केले आहे. समुहाची ही यशोगाथा जिल्ह्यातील अन्य महिला समुहांना प्रेरणा देणारी आहे. अध्यक्षा जागृती पोटले, सचिव करिना गुरव आणि खजिनदार विजया चव्हाण यांच्यासह अन्य महिला सदस्यांच्या अथक परिश्रमांतून हे यश प्राप्त होत आहे. त्यांच्या या वाटचालीत उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, तालुका अभियान व्यवस्थापक दक्षता पांजरी व अन्य अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

चौकट
‘कोकम बटर’ला मोठी मागणी
श्री समर्थ कृपा स्वयंसहायता समुहाने तयार केलेल्या उत्पादनांची विक्री कणकवली येथील उमेद मार्ट तसेच स्थानिक पातळीवर केली जाते. ''कोकम बटर'' या उत्पादनाला विशेष मागणी असून गाव पातळीवर तसेच वाशी, पुणे, जामनगर, गुजरात अशा ठिकाणीही विक्री केली जाते.

कोट
कोरोना काळात मजुरी बंद झाल्यामुळे कुणावर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण भागातील पारंपरिक कोकम फळावर प्रक्रिया करून रोजगार निर्माण करण्याचा आमच्या समर्थ कृपा स्वयंसहाय्यता समुहाचा निर्धार एक यशस्वी पाऊल ठरले आहे. ‘उमेद’चे मार्गदर्शन, अर्थसहाय, शासकीय योजना व प्रशिक्षण यासाठी खूप उपयुक्त ठरले. स्वयंरोजगार करण्याचे धाडस उमेदच्या मार्गदर्शनामुळे महिलांमध्ये आले. म्हणूनच आज कोकम प्रक्रिया करत दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करीत आहोत. यामुळे प्रक्रिया केलेल्या उत्पादनाला आकर्षक पॅकिंग करीत खात्रीशीर बाजारपेठ देखील मिळविली आहे. उमेदवाराच्या साथीने आम्ही नवीन ‘मिनी रिफायनरी’ यंत्रणा सुद्धा घेतली आहे. प्रत्येक महिलेच्या हाताला काम व पैसा मिळू लागला आहे. प्रत्येकाची परिस्थिती बदललेली आहे. भविष्यात या माध्यमातून गावातील इतर महिलांना सुद्धा स्वयंरोजगार देऊन प्रक्रिया व्यवसायात वाढ करण्याची इच्छा आहे. ‘घेऊन उमेदची साथ, केली गरीबीवर मात’.
- जागृती पोटले, अध्यक्षा, श्री समर्थ कृपा स्वयंसहाय्यता समूह.

चौकट
नाव :- श्री समर्थ कृपा स्वयंसहायता समूह
स्थापना :- ५ डिसेंबर २०१७
सदस्य संख्या :- १०
प्रभाग :- खारेपाटण
गाव :- खारेपाटण
तालुका :- कणकवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT