शिक्षणात चमक दाखवणाऱ्या मुलींना पुण्यातून मदत
संपदा कुंटे यांचा पुढाकार ; शैक्षणिक खर्चाची उचलली जबाबदारी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ११ : तालुक्यातील निगुंडळ येथील दुर्गम खेड्यात राहणाऱ्या दोन हुशार मुलींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या संपदा कुंटे यांनी स्वीकारली आहे. शिक्षकदिनाचे औचित्य साधत कुंटे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून या उपक्रमाचे उद्घाटन केले.
निगुंडळ येथील ११वी विज्ञान शाखेत शिकणारी पायल धामणस्कर आणि ७वीतील मंजिरी धामणस्कर या दोन बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी कुंटे यांनी घेतलेली आहे. त्यांचे पालक मजुरी करून कुटुंब सांभाळतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्या दोघीही अत्यंत हुशार असून, वाढत्या खर्चामुळे त्यांचे शिक्षण धोक्यात आले होते. हे लक्षात घेऊन येथील प्रज्ञा धामणस्कर-ताम्हणकर व संदीप चव्हाण यांनी या कुटुंबासाठी धडपड केली. त्यातून संपदा कुंटे यांच्यामार्फत ही मोलाची मदत मिळाली आहे. कुंटे या रोटरी क्लबच्या सरचिटणीस व सेवार्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. या दोन्ही मुलींचा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीचा आवश्यक सर्व खर्च कुंटे उचलणार आहेत. गुहागर येतील साहित्य वाटपावेळी संदीप चव्हाण, प्रज्ञा धामणस्कर-ताम्हणकर, मुलींचे पालक, ग्रामस्थ संदीप खोले, निष्णात ताम्हणकर आदी उपस्थित होते.
----
चौकट
संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळेल
सेवार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केल्यामुळे त्यांचे भविष्य उजळणार आहे. या मदतीमुळे केवळ दोन मुलींचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळेल, असा विश्वास तळवली ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.