कोकण

चिंतातूरपणा-एकविसाव्या शतकातील महामारी

CD

लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(५ सप्टेंबर टुडे ३)

काळजी ही एक नैसर्गिक भावना आहे, ज्याची प्रचिती सर्वांनाच कधी ना कधी येत असते. काळजीसोबत भीती, दहशत, बेचैनी अशा भावना येत असतात. भीती वाटणे ही सर्वसाधारण बाब आहे. अनेकवेळा ती एक मदतशील प्रतिक्रिया असते तणावाचा सामना करण्यासाठी. कुठलाही मोठा निर्णय घेण्यासाठी चिंता आपल्याला सचेत करत असते.

- rat११p९.jpg -
P25N90763
- श्रुतिका कोतकुंडे
-----
चिंतातूरपणा-एकविसाव्या शतकातील महामारी

एकविसाव्या शतकात मात्र बदलती जीवनशैली, जीवनाची सुस्साट गती, सामाजिक माध्यमातून होणाऱ्या माहितीचा भडिमार तसेच वाढती स्पर्धा या सर्व गोष्टी चिंता व चिंतेमुळे होणारे आजार वाढण्याचे महत्वाचे कारण आहेत. या सर्व कारणांमुळे चिंतातूरपणा एक महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. व्यक्ती, समाज व अर्थकारणासाठी याचे दूरगामी परिणाम होतात. कारण, चिंतेच्या समस्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. हे आजार दीर्घकाळ चालतात व रुग्णाला अपंग, अगतिक करतात ज्यामुळे व्यक्तीच्या सर्वसाधारण आयुष्यामध्ये अडथळे व बंधने येतात.

*प्रमाण ः चिंतातूरपणा ही सर्व मानसिक समस्यांमधील सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येणारी मानसिक समस्या आहे. जगभरात दहात एक व्यक्तीला हा त्रास होत असतो. महिलांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते तसेच याची सुरुवात बालपणात किंवा कुमारवयात होते. बऱ्याचदा नैराश्य व व्यसने चिंतातूरपणाच्या जोडीला उद्भवताना दिसतात.
*लक्षणे ः भावनिक व वैचारिक लक्षणे- बेचैन वाटणे, हुरहूर वाटणे, अनियंत्रित काळजी, एकच झुरणारा विचार येणे, लक्ष विचलित होणे, चिडचिड होणे.
शारीरिक लक्षणे- छातीत धडधड, श्वास कोंडणे, घाम येणे, थरथरणे, अशक्तपणा, उमासे येणे.
*वर्तनातील बदल - तणावपूर्ण प्रसंग टाळणे, दडपण येणे, अबोल असणे, सामाजिक संपर्क टाळणे.
*प्रकार ः चिंतेच्या आजाराचे विविध प्रकार असतात, जसे सततची अनामिक भीती वाटणे किंवा पॅनिक डिसऑर्डर म्हणजे भितीचे झटके येणे श्वास कोंडला जाणे, धडधड वाटणे. सामाजिक संपर्क टाळणे किंवा लाजवटपणा हा देखील सामाजिक चिंतेचा आजार असू शकतो तसेच विशिष्ट वस्तू, प्राणी, प्रसंगाची किंवा जागेची भीती वाटणे म्हणजे फोबिया हा देखील चिंतेशी निगडित आजार आहे.
*कारणे ः वैयक्तीक कारणांमध्ये कुटुंबीयांमध्ये चिंतेचा आजार असल्यास पुढच्या पिढीत तो होण्याची शक्यता वाढते. मेंदूतील काही रासायनिक असमतोलामुळे चिंतेचे आजार उद्भवतात तसेच ताण व वातावरणातील बदल, दीर्घकालीन ताण, तणावपूर्ण घटना हेही कारणीभूत असू शकतात.
*उपाय ः चिंतातूरपणा जरी मोठी आरोग्यसमस्या असली तरीही त्याचे उपाय करणे सहजशक्य आहे. समुपदेशन, औषधे जीवनशैलीतील बदल व सामाजिक आधार दिल्यास व्यक्ती बरा होतो व एक सुखी समाधानी व क्रियाशील जीवन जगू शकतो.
*सार्वजनिक आरोग्यावर परिणाम ः दीर्घकालीन चिंतेमुळे रक्तदाब वाढणे, हृदयविकार बळावणे तसेच प्रतिकारशक्ती कमी होणे, पचनाचे आजार बळावणे, झोपेच्या समस्या, डोकेदुखी असे त्रास उद्भवतात तसेच मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे कार्यक्षमता घटणे, एकटे पडणे, चिडचिड होणे अशा समस्या वाढतात. यामुळे व्यक्ती समाजापासून तुटत जातो व त्याची कार्यक्षमता कमी झाल्याने आर्थिक पडसादही सोसावे लागतात.
*प्रतिबंधात्मक उपाय ः याबद्दल सामाजिक सर्व पातळ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेची आहे व उपचारासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. उपायांची सुलभता वाढणे गरजेचे आहे कारण, प्रमाण वाढले असले तरी एक चतुर्थांश रुग्ण फक्त उपचार स्वीकारतात. शाळा, कॉलेज, कार्यालये, रुग्णालय येथे जागृतीपर उपक्रम घेता येतील. मानसिक आजाराबद्दल भयगंड किंवा कलंकांची भावना ही बऱ्याचदा अडसर बनते. त्यामुळे मानसिक आरोग्याबद्दल जागृती वाढवणे गरजेचे आहे. मानसिक समस्यांची माहिती व उपाय सर्वसाधारण शारीरिक आरोग्यासोबत दिले गेले तर हा संकोच व कलंक नाहीसा होईल व रुग्णाला उपाय व मदत लवकर मिळू शकेल.

(लेखिका सामाजिक काम करणाऱ्या मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : काश्मीरहून दिल्लीला ३६ टन सफरचंद पाठवले जाणार

Manchar News : स्मार्ट मीटरमुळे गरीब शेतमजुरांवर लाखोंचे वीजबिल, आंबेगावात कुटुंब अंधारात

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT