गृह राज्यमंत्री योगेश कदम
उद्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर
सावंतवाडी, ता. १३ ः आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे शिवसेना पक्षाने आता विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात शिवसेनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी (ता. १५) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील विविध समस्यांसंदर्भात बैठक आयोजित केली आहे. मंत्री झाल्यावर प्रथमच ते जिल्ह्यात येत आहेत. सोमवारी सकाळी ८.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, ८.३० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट या निवासस्थानी सदिच्छा भेट, नऊ ते दुपारी बारा या वेळेत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांची आढावा बैठक (वैश्य भवन हॉल, सावंतवाडी), दुपारी १ ते ३ पर्यंत मालवण विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांच्या विषयावर आढावा बैठक (कुडाळ गुलमोहर हॉटेल) व सायंकाळी ३.३० ते ६.३० या वेळेत कणकवली विधानसभा क्षेत्रातील विभागांची आढावा बैठक (भगवती मंगल कार्यालय, मराठा मंडळ, कणकवली) व सायंकाळी ६.४० वाजता कुडाळकडे आगमन.
...........................
सावंतवाडीत १७, १८ ला
पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
सावंतवाडी, ता. १३ ः शहराच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या चिवार टेकडी येथील पाण्याच्या साठवण टाकीची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे १७ आणि १८ सप्टेंबरला शहराच्या अनेक भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, पाणी टाकीच्या नियमित सफाईमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना यामुळे होणाऱ्या गैरसोयींबद्दल नगरपरिषदेने दिलगिरी व्यक्त केली आहे. या कालावधीत, सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून काजरकोंडपर्यंत, सिक्वेरावाडा, लाडाची बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंब, डोंगरे पाणंद, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाज मंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, बजरवाडी, नाडकर्णी पाणंद, जेल परिसर, जगन्नाथ भोसले उद्यान मागील भाग, शिल्पग्राम परिसर आणि श्रमविहार कॉलनी या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतरच्या दोन दिवसांत, म्हणजेच १९ आणि २० सप्टेंबरला, पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.