- rat१५p५.jpg-
२५N९१६२२
राजापूर ः कार्यक्रमात बोलताना श्रीनिवास मच्छा. शेजारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, डॉ. विकास पाटील, प्रा. एस. व्ही. निंबाळकर.
‘एड्स’विषयी समाजात आजही गैरसमज
श्रीनिवास मच्छा ः खापणे महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः एड्स आजाराविषयी समाजात आजही गैरसमज आहेत. समाजाकडूनही अशा रुग्णांना मानसिक बळ देणे गरजेचे असून, एड्स आजारावर काळजी हाच खूप मोठा उपचार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन या आजारापासून दूर राहूया, असे आवाहन लांजा येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रीनिवास मच्छा यांनी केले.
तालुक्यातील रायपाटण येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘रेड रिबन क्लब कार्य व स्वरूप’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. व्ही. निंबाळकर आदी उपस्थित होते. प्रस्तावना करताना डॉ. मेश्राम यांनी एड्सविषयी समाजात अजूनही जनजागृतीची गरज असून, या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी तरुणाईने पुढे यावे असे आवाहन केले.