९१९१०
निबंध स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलचे यश
रत्नागिरी : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम काल (ता. १५) झाला. या स्पर्धेमध्ये पटवर्धन हायस्कूलच्या पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समृद्धी शिरगावकर हिने प्रथम व दुर्वा चव्हाण हिने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन लोकमान्य सोसायटीच्या कार्यालयामध्ये सन्मानित केले. मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, पर्यवेक्षिका शिरोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेसाठी हर्डीकर, कनोजे व गांधी यांच्या नियोजन समितीने काम पहिले. संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी गुणवंत मुलांचे कौतुक केले.
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात
रत्नागिरी : क्रीडा व युवकसेवा संचालनालयातर्फे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा शासकीय जलतरण तलावात झाल्या. सहाय्यक क्रीडाधिकारी, स्पर्धाप्रमुख गणेश जगताप, खैरमोडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेला ९ तालुक्यांतील ११० जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला. रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेच्या सचिव मनीषा बेडगे, उपाध्यक्ष गोपाल बंगलोरकर, खजिनदार संजय बेडगे, सागर पाटील, प्रवीण शिवलकर, प्रथमेश बेडगे, देवेन बेडगे, तनया सावंत, केतकी सावंतदेसाई, सौरभ बलेकर, विनायक पवार, ऐश्वर्या शिवलकर, विशाल लटके, अथर्व पवार, रोहन गोरे, ओजस खेऊर, तेजस केसरकर, अथर्व शिवलकर, सोहम नमसले, नीलेश शिवलकर, गिरीश सावंत, स्वयंम नागवेकर, ओजस शिवलकर, अजिंक्य पाटील इत्यादींनी पंच, तांत्रिक सहायक म्हणून स्पर्धेचे काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.