कोकण

दाभोळे माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन

CD

दाभोळे माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन
साखरपा : दाभोळे माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी विषय शिक्षक मनोहर कनावजे यांच्या संकल्पनेतून हा दिवस साजरा करण्यात आला. देशभक्तिपार गीतगायन, रांगोळी स्पर्धा झाल्या. आठवीतील विद्यार्थी प्रबुद्ध कांबळे याने गीतगायन केले तसेच शिक्षक दीपक बने यांनीही देशभक्तिपर गीत गायिले. कनावजे यांनी हिंदी भाषेचे महत्त्‍व सांगितले.

रामपूर एज्युकेशन सोसायटीची शनिवारी सभा
चिपळूण ः रामपूर एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता.२०) सकाळी ११ वाजता रामपूर येथील मिलिंद हायस्कूल येथे होणार आहे. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन, मंजुरी, २०२४-२५चा ताळेबंद, उत्पन्न, खर्चपत्रक आणि अहवाल सादर करणे व मंजुरी, २०२५-२६ साठी लेखा परीक्षकांची निवड व त्यांचे मानधन ठरवणे, घटनादुरुस्ती, १० वी व १२ वी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष शंकर साळवी, सेक्रेटरी सदानंद तथा भाई चव्हाण, सहसेक्रेटरी सुरेश साळवी यांनी केले आहे.

‘नॅब’तर्फे मोतिबिंदू तपासणी शिबिर
चिपळूण ः येथील नॅब आय हॉस्पिटल व शृंगारतळी येथील विष्णुपंत पवार रुग्णालयातर्फे गुहागर तालुक्यातील नेत्ररुग्णांसाठी मोफत मोतिबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. दिनेश जोशी यांनी रुग्णांची तपासणी केली. नॅब हॉस्पिटलचे विकास अधिकारी संदीप नलावडे यांनी नियोजन केले होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी विष्णुपंत पवार हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र पवार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

पोफळी प्रशालेचे कुस्तीत यश
चिपळूण : रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पोफळी न्यू इंग्लिश स्कूलने उत्तुंग यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये 79 किलो वजनीगटामध्ये ग्रीको रोमन प्रकारात हर्षवर्धन मदने याने प्रथम क्रमांक मिळवला. त्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली. शमिका पवार या खेळाडूने ५७ किलो वजनीगटामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. गार्गी मोरेने ६१ किलो वजनीगटामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक, विज्ञानशिक्षक व समुपदेशक प्रदीपकुमार यादव, कुस्ती प्रशिक्षक आप्पासो मदने यांचे मार्गदर्शन लाभले.

‘रोटरी’कडून खडपोली हायस्कूलला संगणक
चिपळूण : खडपोली येथे न्यू इंग्लिश स्कूलला पुणे येथील रोटरी क्लब घोरपडी या संस्थेतर्फे तीन संगणक संच भेट देण्यात आले. कार्यक्रमाला परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक पराग भावे, रोटरी क्लब पुणेचे अध्यक्ष श्यामकुमार कदम, सचिव शाम वाघमारे, खजिनदार अशोक शेट्टी, मुख्याध्यापिका वीणा चव्हाण, आकाश कांबळे, सुजाता गवळी, निवेदिता साळवी, शैला शिंदे, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सदस्य अनंत गजमल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT