कोकण

नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट

CD

92714

यंदाच्या नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट

जिल्ह्यात मुसळधार; जिल्ह्यात २२ पर्यंत ग्रीन अलर्ट, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ ः जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून आणखी काही दिवस कायम राहणार असून सोमवार (ता.२२) पासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट राहणार आहे. दरम्यान, आज सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असेच चित्र आहे. गुरूवारी (ता.१८) सकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. त्यानंतर काही वेळ पावसाने उघडीप दिली. परंतु, दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. मालवण, कणकवली, वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील काही अंशी वाढ झाली होती. त्यानंतर रात्री देखील पावसाच्या सरी अधुनमधून सुरूच होत्या.
दरम्यान, आज पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात २२ पर्यंत ग्रीन अलर्ट दिला आहे. या कालावधीत काही भागांत जोरदार तर काही भागात हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. २२ ला घटस्थापनेने नवरात्रोत्वाला प्रारंभ होणार आहे. सध्या अनेक मंडळांकडून नवरात्रोत्सवाची पुर्वतयारी सुरू आहे. मात्र, या सर्व कार्यक्रमांवर पावसाचे सावट कायम असणार आहे.
---------------
२ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज
जिल्ह्यात आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार हे हवामान विभागाच्या अंदाजानंतर स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने १८ ते २५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ७ ते १९ मिलीमीटर तर २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत १० ते १५ मिलीमीटर इतक्या पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये १० ते १५ टक्केनी वाढ देखील अपेक्षित आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Cries for Panipuri VIDEO : पाणीपुरीसाठी कायपण…! महिलेन थेट रस्त्यातच ठाण मांडत सुरू केलं मोठ्यानं रडण अन् मग...

IND vs OMN Live: ८ विकेट पडूनही सूर्यकुमार यादव फलंदाजीला का आला नाही? समोर आलं कारण...

Manipur: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला; दोन जवान हुतात्मा, छायाचित्रे व्हायरल

Pune Road Potholes : पुणेकरांची खड्ड्यातून मुक्ती नाहीच! सीसीटीव्हीसाठी ५५० किलोमीटरची रस्ते खोदाई होणार

Barshi Crime : बार्शीच्या रेणूका कला केंद्रातील व्यवस्थापकाचे अपहरण; २० लाखांची मागितली खंडणी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT