Why Suryakumar Yadav Did Not Bat VS Oman Despite India Losing 8 Wickets
ESAKAL
भारताने आशिया चषक २०२५ मधील शेवटच्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८८ धावा केल्या.
कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्व फलंदाजांना संधी मिळावी म्हणून टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली.
तरीही सूर्या स्वतः फलंदाजीला उतरला नाही आणि ११व्या क्रमांकापर्यंतही आला नाही.
India vs Oman Marathi Live Update Cricket : भारताने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८८ धावा उभ्या केल्या. भारतीय फलंदाजांना खेळण्याची चांगली संधी मिळावी, यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारताला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. विकेट मागून विकेट पडत असताना सूर्यकुमार फलंदाजीला न आल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. ११ व्या क्रमांकावरही तो फलंदाजीला आला नाही. त्याने असं का केलं?