नवदुर्गा--लोगो
-rat२६p१६-
२५N९४४८८
शिल्पा श्रुंगारे
-----
क्रीडांगणापासून प्रशासकीय क्षेत्रातही विजयी झेंडा
शिल्पा श्रुंगारे : व्हॉलीबॉलसह थ्रोबॉलमध्ये चमक, उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः शाळेत जपलेली खेळाची आवड विवाहानंतरही कायम ठेवत त्यात नैपुण्य मिळवण्याची कामगिरी चिपळूण प्रांत कार्यालयातील सहाय्यक मसहूल अधिकारी शिल्पा श्रुंगारे यांनी जोपासली आहे. गेल्या १८ वर्षाच्या कालावधीत कौटुंबिक जबाबदारी, शासकीय नोकरी करत असतानाच व्हॉलिबॉल, थ्रो बॉलमध्येही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे. खेळातील यशस्वी कर्णधार आणि प्रशासकीय कामकाजातही तितकेच गतिमान कारभार करणाऱ्या श्रुंगारे यांचा कोकण आयुक्तांनी उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून गौरव केला आहे.
श्रुंगारे यांचा जन्म २३ मे १९८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झाला. त्यांचे पहिली ते महाविद्यालयीन कागल येथेच झाले. लहानपणापासून खेळामध्ये आवड असल्याने घरच्यांनी व्हॉलीबॉल क्रीडाप्रकारामध्ये आवड ओळखून संधी उपलब्ध करून दिली. त्यानुसार माध्यमिक शिक्षणादरम्यान विभागस्तरावर १४ वर्षाखालील व्हॉलिबॉलमध्ये त्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे देवळाली प्रवरा (अहमदनगर) येथील राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले. कागल तालुका बहुविध क्रीडा महोत्सवात तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत अंतिम विजय संपादन करून प्रथम क्रमांक मिळवला होता तसेच १७ वर्षाखालील महाराष्ट्र शासनाच्या गारगोटी येथे ५ नोव्हेंबर २००१ मधील आयोजित स्पर्धेत अंतिम विजय प्राप्त केला. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही त्यांनी खेळाची आवड जोपासली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरअंतर्गत २००५-०६ क्रीडास्पर्धेत अंतिम विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. यानंतर रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयअंतर्गत जिल्हा निवड समितीमार्फत आयोजित लिपिक भरती परीक्षेत खेळाडू कोट्यातून त्यांची लिपिक पदावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ४ एप्रिल २००७ ला महसूल शाखेत निवड झाली. महसूल विभागातील नियमित कामातूनही खेळातील आवड जोपासत महसूल विभागांतर्गत थ्रो बॉल क्रीडाप्रकारात त्यांनी चुणूक दाखवली. त्यांच्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करत कोकण विभागस्तरावर २००७ ते २५ दरम्यान रत्नागिरी जिल्हा अजिंक्य राहिला. महसूल विभागअंतर्गत राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करून कोकण विभागाला विजय प्राप्त करून दिला. १५ फेब्रुवारी २०२५ मधील वेंगुर्ला येथील विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा अंतिम विजेता ठरला. २३ फेबुवारी २०२५ रोजी नांदेड येथील राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत जिल्हा संघास उपविजेतेपद मिळवून दिले. या कामगिरीमुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा सन्मानदेखील केला. पती उमेश गिज्जेवार हे देखील महसूल विभागात खेड येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली असून दीर, सासू-सासरे असे एकत्रित कुटुंब चिपळुणात वास्तव्याला आहे.
चौकट
महापूरात महत्वपूर्ण काम
श्रुंगारे या चिपळूण उपविभागाचे जमीनविषयक विविध दावे, सुनावणी, निवडणूक, भूसंपादनविषयक कामे सांभाळतात. २०२१ मध्ये गर्भवती असताना बाजारपेठेतील सर्व पूरग्रस्तांचे पंचनामे व त्यांचे खाते व्यवस्थित तपासून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कामे केली. गेल्या १८ वर्षाच्या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा, भूसंपादन, कुळवहिवाट, तहसीलदार कार्यालय चिपळूण अशा विविध कार्यालयात कामकाज केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.