कोकण

पोलिसांना मदत करणाऱ्या पिता-पुत्रांचा सत्कार

CD

-rat२९p३३.jpg-
P२५N९५४३८
लांजा ः पोलिस ठाण्याच्या वतीने महेश गजबाल यांचा गौरव करताना पोलिस अधिकारी.
---
पोलिसांना मदत करणाऱ्या
पिता-पुत्रांचा सत्कार
लांजा,, ता. २९ ः धोकादायक कोंड्ये-माजळ धरणातून मृतदेह बाहेर काढून पोलिसांना सहकार्य करणाऱ्या वेरळ पातेरे गावचे पोलिसपाटील महेश गजबाल आणि त्यांचे वडील वसंत गजबाल यांचा लांजा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तालुक्यातील माजळ धरणामध्ये २० सप्टेंबरला घडलेल्या दुर्घटनेत विशाल बाळकृष्ण माजळकर यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मृतदेह खोल पाण्यात अडकल्याने तो बाहेर काढणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यावेळी वेरळ पातेरेचे पोलिसपाटील महेश गजबाल व त्यांचे वडील वसंत गजबाल यांनी धरणातील मृतदेह बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल महेश गजबाल यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. या वेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, उपनिरीक्षक अमोद सरंगले, शिवस्वराज्य पोलिसपाटील संघटना अध्यक्ष दीपक तरळ, उपाध्यक्ष राजेश मोरे, भडे पोलिस पाटील प्रशांत बोरकर, शिरंबवली पोलिस पाटील दर्शना सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT