96906
समीर नलावडे
96907
संदेश पारकर
कणकवली नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव
सुशांत नाईकांचा पत्ता कट; पारकर-नलावडे सामना पुन्हा शक्य
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ ः कणकवलीचे नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे सद्य स्थितीचे पक्षीय राजकारण पाहता माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यात पुन्हा सामना रंगण्याची शक्यता आहे. तर ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याने शिवसेनेचे सुशांत नाईक यांचा पत्ता कट झाला आहे.
निवडणुका होणार असलेल्या नगरपंचायत, नगरपालिकांचे आरक्षण सोडत आज जाहीर केली. यात कणकवली नगरपंचायतीवर खुला प्रवर्ग की ओबीसी? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. यात कणकवलीसाठी ओबीसी आरक्षण निश्चित झाले आहे. कणकवली नगरपंचायतीची यापूर्वीची निवडणूक एप्रिल २०१८ मध्ये झाली होती. यात भाजपकडून संदेश पारकर आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून समीर नलावडे यांच्यात थेट लढत झाली होती. यात श्री.पारकर यांचा अवघ्या ३७ मतांनी पराभव झाला होता. पाच वर्षात सिंधुदुर्गच्या राजकारणात बदल झाले. यात राणेंचे सर्व शिलेदार भाजपमध्ये आले. तर पारकर यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते भाजपतून शिवसेनेत दाखल झाले. कणकवली नगरपंचायतीची कार्यकारिणी मे २०२३ मध्ये समाप्त झाली. त्यानंतर आरक्षणाच्या मुद्यावर निवडणुका लांबल्या होत्या. मात्र, निवडणुका कधीही लागण्याची शक्यता गृहीत धरून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निवडणुकीची तयारी सुरू ठेवली होती. तर शिवसेनेचे सुशांत नाईक यांनीही शहरात कार्यकर्त्यांची ताकद वाढवली होती. पुढील महिन्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या कालावधीत कणकवलीतील महत्वाच्या नेत्यांचे अन्य पक्षात प्रवेश सोहळे न झाल्यास भाजपकडून समीर नलावडे आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडून संदेश पारकर किंवा त्यांचे बंधू कन्हैया पारकर हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असतील. कणकवली नगरपंचायतीची स्थापना २००२ मध्ये झाली. २००३ मध्ये पहिली निवडणूक झाली. यात संदेश पारकर हे थेट जनतेमधून निवडून आले होते. २००८ ते २०१३ आणि २०१३ ते २०१८ अशी दहा वर्षे कणकवली नगरपंचायतीचे आरक्षण महिलांसाठी राखीव झाले होते. २०२३ मध्ये कणकवलीचे नगराध्यक्षपद खुले होते. तर आता नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षण निश्चित झाले आहे.
---------------
पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
सिंधुदुर्गातील नगरपरिषदा, नगरपंचायत, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे अध्यक्ष, सभापतींची नावे पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडून निश्चित केली जातात. कणकवलीत भाजपकडून समीर नलावडे यांचे नाव अग्रेसर असले तरी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे किंवा अन्य पक्षातून येणारा बडा नेता देखील भाजपकडून नगराध्यक्षपदाचा दावेदार असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.