कोकण

खराब रस्त्यांबाबत नागरिकांची मागणी

CD

-rat६p२३.jpg-
P२५N९६८८९
रत्नागिरी : निवखोल, राजिवडा रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल सुधारणेची मागणी करणारे निवेदन नगरपालिकेत देताना स्थानिक रहिवासी.
---------
निवखोल, राजिवडा रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी पालिकेला निवेदन ; नागरिकांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : जिल्हा शासकीय रुग्णालय, निवखोल, राजिवडा, आंबेशेत या भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे रस्त्यांच्या तातडीने डांबरीकरण व दुरुस्तीची मागणी करणारे निवेदन आज सादर करण्यात आले.
नगरपालिकेने हॉट मिक्स पद्धतीने निवखोल घाटीसह केलेला उत्तम रस्ता पावसाळ्यानंतर अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहे. गणेशोत्सवादरम्यान भरलेले खड्डे अत्यंत अयोग्य पद्धतीने भरले गेले असल्याने खड्ड्यांच्या जागी आता उंचवटे व चर तयार झाले आहेत. यामध्ये कामावर योग्य अनुभवी देखरेख नसल्यामुळे सद्हेतूने केलेल्या दुरुस्तीनंतर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहतुकीची तीव्र समस्या असून, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. निवेदनाद्वारे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची तातडीने डांबरीकरणाची कामे हाती घ्यावीत, नाल्यांची साफसफाई करावी, गटारांचे व्यवस्थापन करावे, उतारावरील दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. मागण्यांचे निवेदन गणेश भारती, दीपक सुर्वे, राजीव लिमये, आनंद लिमये, संतोष चव्हाण व प्रवीण वायंगणकर, मिलिंद हतफळे, अख्तर शिरगावकर, सुहेल मुकादम आदींसह ग्रामस्थांनी सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर

Viral: 'ये हिरो डोक्याची गोळी घे पण ऑफिसला ये' बॉस आणि कर्मचाऱ्याचं चॅट व्हायरल, म्हटला...'काही झालं तरी...'

ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा; स्मृती मानधनालाही नामांकन

LAL KITAB PREDICTION 2025 : राहूमुळे तुमची शांतता होणार भंग ! 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, जाणून घ्या मासिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT