कोकण

झेन झी तरुणाई आणि आक्रमकता

CD

लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(२६ सप्टेंबर टुडे ३)

गेल्या पंधरवड्यात चिपळूणमध्ये एका कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये घडलेल्या हिंसक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि रोजच आजूबाजूला घडणाऱ्या तरुणांमधील वाढत्या भावनिक उद्रेकाच्या घटनांकडे लक्ष देण्याची व त्याकडे सार्वजनिक आरोग्याच्या नजरेतून बघण्याची गरज वाटली. त्या निमित्ताने थोडा शास्त्रीय दृष्टिकोनावर चर्चा करणे गरजेचे आहे...!
- rat९p६.jpg-
25N97492
- डॉं. श्रुतिका कोतकुंडे
---
झेन झी तरुणाई आणि आक्रमकता

झेन झी म्हणजे १९९५ ते २०१२ या दरम्यान जन्मलेली पिढी. जी आता सध्या वयोगट १५ ते ३० या वयोगटात मोडते. या पिढीबद्दल आज समजून घेऊया. आजकाल कुठलेही वर्तमानपत्र उघडले तर जाणवते की, हिंसक घटना सर्रास होताना आढळतात. मग ते वाढते बलात्कार व नंतर केलेली निर्घृण हत्या, लव जिहाद वा तत्सम ऑनर किलिंग, बेछूट गोळीबार, दंगली, दहशतवादी कार्यवाही, युद्ध इत्यादी. रोज अशा मन अस्वस्थ करणाऱ्या घटना बघितल्या की, काळजी वाटते. आपला समाज कुठे चालला आहे! कधी गर्दीच्या ठिकाणी बाचाबाची होताना दिसते, कधी रस्त्यावर रागाचा उद्रेक दिसतो, अपघातक्षणी मदतीऐवजी हाणामारी, शिवीगाळ तर कधी कुटुंबकलहातून होणाऱ्या खुनाच्या घटना तसेच सामूहिक हिंसाचाराच्या घटना जसे माणसाला ठेचून मारणे, धार्मिक तेढ निर्माण करून उत्सवाच्यावेळी भावना भडकवल्या जात आहेत. छोट्या कारणांवरून हल्ली दंगली उसळत आहेत. जागतिक पातळीवर युद्ध व युद्धजन्य परिस्थिती वाढली आहे. या सर्वांमुळे असुरक्षिततेची भावना वाढली आहे. हिंसाचाराच्या वाढत्या प्रमाणामुळे हिंसा करणे सर्वमान्य होताना दिसतेय. आपल्या संवेदना बोथट झाल्यात व काहीअंशी स्वीकार्य आहेत, असे वाटू लागले आहे. शारीरिक हिंसेसोबत सार्वजनिक आयुष्यात मानसिक हिंसा वाढली आहे. हिंसा कधी शब्दात व्यक्त होत असते जसे शिवीगाळ करणे, बिनबुडाचे आरोप करणे, अफवा पसरवणे. शारीरिक हिंसा म्हणजे स्वतःला किंवा दुसऱ्याला दुखापत करणे. भावनिक छळ म्हणजे आवडती वस्तू हिरावणे, आवडत्या व्यक्तीपासून तोडणे, अन्न-वस्त्र-निवारा हिरावून घेणे इत्यादी. लैंगिक हिंसा हाही वाढत्या छळवणुकीचे द्योतक आहे. शारीरिक छळ करणारे जास्तकरून युवकांमध्ये व पुरुषांमध्ये आढळते तर मानसिक हिंसा महिलांमध्ये आढळते. हिंसा सर्व समाजात, वयोगटातील व सर्व स्तरात आढळते; परंतु सामाजिक माध्यमातून व बदलत्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमतेच्या वातावरणात हिंसा वाढीस लागली आहे हे नक्की.

- तरुणांसमोरची आव्हाने
* शैक्षणिक दडपण ः एकविसाव्या शतकात वाढता ताण व सामाजिक दडपण एक मोठे कारण ठरत आहे. कारण, या पिढीवर शैक्षणिक दबाव आहे. चांगले शिक्षण, संधी, नोकरी, व्यवसाय यासाठी प्रचंड स्पर्धा आहे तसेच व्यवसायाबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे नोकरीची शाश्वती नाही. मुलांमध्ये व पालकांमध्ये संवाद तुटत चालला आहे. संवेदनशीलता कमी होऊ लागली आहे व पालक मुलांमध्ये समन्वय नाही.
* आर्थिक असुरक्षितता ः आर्थिक विषमता, महागाईमुळे सतत संघर्ष चालू असल्यामुळे ताण आहे. आर्थिक सुबत्ता व सुरक्षितता मानसिक स्थिरतेसाठी महत्त्वाची असते.
* समाजमाध्यमे ः सामाजिक माध्यमे व्यक्त होण्यासाठी चांगले व्यासपीठ असले तरी त्याचे धोके म्हणजे न्यायीकरण, शुल्लकीकरण, ट्रोलिंग व एफओएमओ. सायबर हिंसा व छळवणूक या नवीन समस्यांमुळे ताण वाढीस लागला आहे व भावनिक उद्रेक होत आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमे दुधारी तलवारीसारखी काम करतात
* विस्कळीत व विभक्त कुटुंबव्यवस्था ः बदलत्या समाजव्यवस्थेत कुटुंबे विखुरली गेलीत व अधिक व्यस्तपणामुळे मोजकाच संवाद होतोय. समाजमाध्यमावर ढीगभर मित्र असले तरी जिवाभावाचं असे एखाद नातं उरलं नाही. त्यामुळे मुलांना, तरुणांना एकटेपणा जाणवत आहे.
* अपुरी आधारव्यवस्था ः वाढत्या सामाजिक बदल व उसवत जाणारी सामाजिक वीण यामुळे शेजारी, नातेवाईक व सहकारी यामध्ये अदृश्य भिंती उभ्या राहिल्यात. त्यामुळे अडीअडचणींत किंवा पालकांशी संवाद तुटला तर कुठे मदत मागावी, अशी माणसे आजूबाजूला नाहीत.
* अतिकाळजी करणारे पालक ः क्वचित पालक मुलांना अति जपतात त्यामुळे मुलं हळवी, घाबरट, नाजूक मनःस्थितीची होतात. कमी होत असलेल्या सामाजिक कौशल्यामुळे समाजाशी जोडून घ्यायला नवीन पिढीला जमत नाही आणि ताण आल्यावर मदत घेण्यास ते पुढे सरसावत नाहीत. कुटुंबात क्लेश किंवा कलह असल्यास बऱ्याचदा मुलं घरापासून तुटत जातात.
*कलंक किंवा खर्चिक मनसोपचार ः मानसिक समस्या आहे हे जाणवले तरी तरुण मदत घेण्यासाठी पुढे येत नाहीत, व्यक्त होत नाहीत कारण, मानसिक आरोग्याबद्दल असलेला संकोच. समाजात मानसिक समस्या असण्याला कमजोरीचे लक्षण मानल्यामुळे ताण लपवला जातो व तरुण झुरत राहतात तसेच उपचार उपलब्ध नसल्यामुळे परवडत नसल्यामुळे योग्य मदतीपासून तरुण वंचित राहतात. मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणा वाढला असला तरी मानसिक आरोग्यसेवा उपलब्धता कमी असल्यामुळे योग्य ती मदत तरुणांना उपलब्ध होऊ शकत नाही.
* जागतिक समस्या ः पर्यावरण बदल, आर्थिक विषमता, आपत्ती, आर्थिक राजकीय अस्थिरपणा व सामाजिक घुसळण यामुळे तरुणावर सार्वजनिक व आंतरिक ताण वाढला आहे.
* सामाजिक दडपण ः विविध कारणांनी तरुणावर ताण वाढला आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय बदल व वाढत असलेली बेरोजगारी, अस्थिर शासकीय धोरणे, हुकलेल्या विकासाच्या संधी व त्यामुळे होणारी घुसमट व उद्रेक हा आंदोलने करून तरुण व्यक्त होत आहेत.
* लींग असमानता ः तरुण पुरुषांवर पारंपरिक अपेक्षा, अर्थार्जन व कणखर असल्याचे सिद्ध करण्याचा ताण आहे. त्यांची संवेदनशीलतेने वागण्याची इच्छा असली तरी समाज त्यास बदलण्याची मुभा देत नाही व आदर्श पुरुषाची वागणुकीची अपेक्षा करते. तसेच तरुण मुलींना शरीरावरून हिणवणे, पारंपरिक आदर्श वागण्याचे दडपण दिले जाते. तिच्या वागण्यावर टीकाटीप्पणी, न्यायीकरण केले जाते. वाढत्या हिंसेमुळे मुलींचा सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे व त्यामुळे तिच्या वागण्यावर बंधने घातली जात आहेत.
* वाढलेली व्यसनाधीनता ः या सर्व ताणतणावाला सामोरे जाताना तरुण पिढी व्यसनाकडे वळलेली दिसते. दारू, तंबाखू, स्क्रीनटाइम्स, ड्रग्स वापर वाढलेला आहे.
*हिंसापीडित हिंसेचा वाहक ः कधी कधी मुलांनी लहानपणी हिंसा अनुभवली असल्यास ती पुढच्या पिढीमध्ये चालू राहते.
* हिंसेची कारणे ः व्यक्तीचे नातेवाईक हिंसक असल्यास व्यक्ती हिंसक बनू शकते.
* मेंदूला दुखापत असल्यास हिंसा करण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये वर्तनसमस्या अतिचंचलपणामुळे होऊ शकते.
* आजूबाजूचे वातावरण ः व्यक्तीने घरात जर हिंसा अनुभवली असेल. जर शाळेत दडपशाही दादागिरी अनुभवली असेल.
* मानसिक आजार ः उदासीनता, भीतीचे आजार, व्यसनाधीनता, तीव्र मानसिक आजार हेही हिंसेची कारणे बनू शकतात.
हिंसा कमी होण्यासाठी म्हणनू कुटुंब, शाळा आणि समाज नक्कीच भरीव कामगिरी बजावू शकतात. तसेच कायदा, सुव्यवस्था व शासन आणि समाज मिळून यावर काम करण्याची गरज आहे. जर एक चांगला समाज घडवायचा असेल तर समाजोपयोगी काम करणारे विविध कला, क्रीडाक्षेत्रातील प्रगती करणारे व आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक काम करणाऱ्या व झटणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांचा आदर्श तरुणाईसमोर ठेवण्याची गरज आहे.

(लेखिका सामाजिक काम करणाऱ्या मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

Government Decision: कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! महिलांना मिळणार मासिक पाळी रजा, सर्व क्षेत्रातील महिलांसाठी लागू

Varinder Singh Ghuman death : धक्कादायक! जगातील पहिला शाकाहारी ‘प्रोफेशनल बॉडीबिल्डर‘ वरिंदर सिंह घुमनचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

SCROLL FOR NEXT