97727
व्हॉलीबॉलमध्ये खर्डेकर महाविद्यालयाचे वर्चस्व
वेंगुर्लेतील स्पर्धा; कुडाळ हायस्कूलचा संघ उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १० ः येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला संघाने विजेतेपद तर कुडाळ हायस्कूल उपविजेता ठरले.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संघर्षाशिवाय यश मिळत नाही. खेळाडूंनी प्रामाणिक मेहनतीने यश प्राप्त करावे, असे सांगितले. प्रमुख पाहुणे सचिन वालावलकर यांनी, खेळात प्राविण्य मिळवत आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन केले. उद्घाटक परब म्हणाले, खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता, भविष्य घडविण्याचा एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे. प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर प्रा. राणे, पर्यवेक्षक डी. जे. शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, कार्यालय अधीक्षक संभाजी पाटील, प्रा. डी. एस. पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, लेफ्टनंट बी. जी. गायकवाड, तालुका समन्वयक संजय परब, मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, प्रितम सावंत, प्रशिक्षक जयवंत चुडनाईक, संजीवनी चव्हाण, क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, तुषार साळगावकर, मंगेश माने आदी उपस्थित होते.
पंच म्हणून राष्ट्रीय पंच अजित जगदाळे, चारू वेंगुर्लेकर, हेमंत गावडे, सॅमसंग फर्नांडिस, कौस्तुभ वायंगणकर, शिवराम नांदोसकर, निशांत, आणि ओंकार गोसावी यांनी काम पाहिले. शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने अध्यक्ष शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे, सेक्रेटरी जयकुमार देसाई आदींनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक हेमंत गावडे यांनी सूत्रसंचालन केले. जिमखाना चेअरमन वीरेंद्र देसाई यांनी आभार मानले.
---
स्पर्धेच्या निकाल असा
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात ः सलग दुसऱ्यांदा विजेता – बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला, उपविजेता – कुडाळ हायस्कूल, कुडाळ, आणि तृतीय – आचिर्णे आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय, वैभववाडी. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात: विजेता – आचिर्णे आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय, वैभववाडी, उपविजेता – कुडाळ हायस्कूल, कुडाळ, आणि तृतीय – बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.