rat10p14.jpg
97777
रत्नागिरी : आरोग्य विभागातर्फे नागरिकांची तपासणी केली जात आहे.
------------
जिल्ह्यात दोन लाख नागरिकांची आरोग्य तपासणी
स्वस्थ नारी, सशक्त परिवार; ३,८३९ शिबिरांचे आयोजन
रत्नागिरी, ता. १० : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्यकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालय येथे ३ हजार ८३९ आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामधून २ लाखांहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद रत्नागिरी व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यावतीने ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष आरोग्य अभियान रत्नागिरी जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबवण्यात आले. या अभियानाला ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, त्यांना आरोग्यविषयक शिक्षण देणे व मोफत आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. अभियानांतर्गत स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, असंसर्गजन्य आजार तपासणी, क्षयरोग तपासणी, सामान्य आरोग्य समस्या निदान व समुपदेशन यांसह अनेक सेवा देण्यात आल्या तसेच किशोरवयीन मुलींसाठी रक्तक्षय तपासणी, मासिक पाळी स्वच्छता जनजागृती, गर्भवती महिलांसाठी प्रसूतपूर्व काळजी व पोषण सल्ला, लसीकरण, आयुष्मान भारत आणि वय वंदनकार्ड वाटप, निक्षय मित्र नोंदणी, रक्तदान मोहीम व अवयवदान जनजागृती अशा विविध उपक्रमांचाही समावेश होता.
चौकट
अभियानातील महत्त्वाची आकडेवारी :
* उच्च रक्तदाब तपासणी ः २८ हजार ३०२
* मधुमेह तपासणी ः ३० हजार ९८५
* कर्करोग तपासणी ः १४ हजार ७७७
* मुख कर्करोग ः ७ हजार ३६४
* स्तन कर्करोग ः ३ हजार ६७९
* गर्भाशय मुख कर्करोग ः ३ हजार ७३४
* गर्भवती महिलांची एएनसी तपासणी ः ४ हजार २१४
* क्षयरोग तपासणी ः २५ हजार ९३१
* क्ष-किरण तपासणी ः २ हजार ९३४
-------
कोट
मोहिमेद्वारे महिलांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता वाढवणे, आजारांचे लवकर निदान करणे आणि कुटुंबांचे आरोग्य बळकट करणे हा उद्देश साध्य झाला आहे.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.