कोकण

पक्ष प्रवेशाचा सिलसिला सुरुच राहील

CD

97825

पक्ष प्रवेशाचा सिलसिला सुरूच राहील

नीलेश राणे ः निवडणुकांत युतीबाबतचा निर्णय वरिष्ठांकडे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय हा वरिष्ठ घेतील. शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेले पक्ष संघटना वाढविण्याचे काम आम्ही करीत आहोत. जिल्ह्यात पक्षाला चांगले वातावरण आहे. विकासाच्या मुद्यावर अनेकजण शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भविष्यात पक्षप्रवेशाचा हा सिलसिला पाहायला मिळेल, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला.
मुंबई येथील दसरा मेळाव्यात शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार तेली हे आज आमदार राणे यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. सावंतवाडी येथे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह शिवसैनिकांनी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत केले. स्वागत सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख परब, माजी आमदार राजन तेली, महिला जिल्हा आघाडीप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस आदी उपस्थित होते. यावेळी आमदार राणे म्हणाले, ‘‘राजकारणात कोणीच कोणाचे कायमस्वरूपी विरोधक नसतात. वेगवेगळ्या पक्षांत काम करताना वैचारिक विरोध असतो. मात्र, वैयक्तिक विरोध नसतो. त्यामुळे त्या त्या पक्षाचे काम करताना कितीही संबंध ताणले तरीही आम्ही नाती कायम राखली. आज शिवसेना म्हणून सर्वजण एकत्र आलो आहोत. प्रशासनावर पकड असलेले तसेच संघटनात्मक बांधणीचा अनुभव असलेले श्री. तेली यांना दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर आमचे नेते श्री. शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला आहे. त्यांच्या अनुभवाचा आगामी निवडणुकांमध्ये निश्चितच फायदा होईल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले कार्य पाहून अनेकजण त्यांच्याकडे आकर्षित झाले. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात आज शिवसेनेतच मोठे प्रवेश होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सर्वसामान्य जनतेतून आधार म्हणून शिवसेनेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेकजण शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक असून, आगामी काळात त्यांचेही प्रवेश होतील. आमदार दीपक केसरकर हे आमचे वरिष्ठ नेते असून, ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा जिल्ह्याला होण्यासाठी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असणे आवश्यक आहे. याबाबत वरिष्ठ निश्चितच विचार करतील.’’ श्री. तेली म्हणाले, ‘‘शिवसेनेत प्रवेश करताना मी कोणतीही अट ठेवलेली नाही. मला शिवसेनेत एकत्र राहून सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला भरभरून यश मिळवून देण्यासाठी काम करायचे आहे. संघटना बांधणीवरच लक्ष राहणार असून, पक्षात कोणत्याही प्रकारचा इगो नसेल. आगामी काळात जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेतील अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पाहायला मिळेल.’’
-----------------
बँकेतील त्रुटींबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधले
सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात काम करीत आहे. त्या बँकेवर मी देखील अध्यक्ष राहिलो आहे. त्यामुळे बँकेबाबत आदर असून, ही बँक टिकावी, ही माझी इच्छा आहे. त्यासाठीच मला ज्या त्रुटी दिसून आल्या त्याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. तेच त्याबाबत निर्णय घेतील, असे श्री. तेली पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
-----------------
‘ती’ प्रतिक्रिया प्रवेशाआधीची
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्याबाबतची राजन तेली यांनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या आधीची आहे. ते त्यांचे त्यावेळचे वैयक्तिक मत आहे. आता ते महायुतीत आहेत, त्यामुळे तो विषय आता तिथेच संपला, असे आमदार राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogesh Kadam Reaction : “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही” ; मंत्री योगेश कदमांचं विरोधकांना प्रत्युत्तर!

Akhilesh Yadav Facebook Account Ban : सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद; तांत्रिक चूक की आणखी काही?

गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी! जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर, तपास सुरू

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

SCROLL FOR NEXT