कोकण

दापोली-दापोलीतील सहा गण महिलांसाठी राखीव

CD

दापोलीतील सहा गण महिलांसाठी राखीव
पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; हर्णै अनुसूचित जमाती महिलांसाठी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १३ : दापोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवभारत छात्रालय येथील सभागृहात आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी संबंधित प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. पंचायत समितीसाठी एकूण १२ गण असून, यापैकी ६ गण स्त्रियांसाठी राखीव ठेवले आहेत.
अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी हर्णै गण राखीव ठेवण्यात आले आहे. येथे सर्वच पक्षांना आयात उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गणासाठी गिम्हवणे व कोळबांद्रे गण राखीव झाला आहे. गिम्हवणे गणासाठी माजी सभापतींच्या नेतृत्वाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, तर कोळबांद्रे गणासाठी नवीन चेहऱ्यांचा शोध पक्षांना घ्यावा लागणार आहे. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी दाभोळ, बुरोंडी व खेर्डी गण राखीव झाले असून, या ठिकाणी नव्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी जुईकर मोहल्ला, पांगरीतर्फे हवेली, टेटवली, जालगाव व पालगड हे गण आहेत. या ठिकाणी अनेक इच्छुकांनी रस दर्शवला असून, विविध पक्षांतर्फे अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी माजी प्रतिनिधी पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, तर काही गणांमध्ये नव्या चेहऱ्यांवर भर दिला जाईल. दरम्यान, आरक्षणाच्या सोडतीमुळे काही विद्यमान पदाधिकारी व माजी सदस्यांची गण आरक्षित झाल्याने त्यांचे पत्ते कट झाले आहेत.

चौकट
शिवसेना विरूद्ध शिवसेना
या आरक्षणानंतर सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामस्तरावर संपर्क दौरे, बैठका व रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. येत्या काही दिवसांत तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रमुख नेते विविध बैठका व सभा घेऊन निवडणुकीसाठी दिशा ठरवतील. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असला, तरी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना या पक्षांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT