कोकण

सहा वाहनांच्या बॅटऱ्या सावंतवाडीतून चोरीस

CD

सहा वाहनांच्या बॅटऱ्या सावंतवाडीतून चोरीस
सावंतवाडी, ता. १३ ः बांद्यापाठोपाठ सावंतवाडी शहरातही भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. विविध ठिकाणी शहरात पार्क केलेल्या डंपर व टेम्पो अशा सहा वाहनांतील बॅटऱ्या चोरून नेल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी आजपासून शहरात रात्रीची गस्त वाढवली. माजगाव गरड येथील विशाल सावंत यांच्या दोन डंपरमधील तर राजवाड्यानजीक आनंद वरेरकर व प्रदीप हडणकर यांच्या दोन आयशर टेम्पो तसेच माजगाव संजीव टायर येथील ऑगस्तीन डिसोजा यांच्या डंपरमधील तसेच अश्फान शेख यांच्या डंपरमधील बॅटऱ्यांसह एकूण सहा वाहनांतील सुमारे ३५ हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत. रविवारी (ता. १२) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाहनमालकांनी सायंकाळी उशिरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा मागमूस पोलिस घेत आहेत. हे चोरटे मोटारीतून आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. रात्रीच्या वेळी शहरात पोलिसांनी गस्त वाढविल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आधारित 'मिशन मुंबई' चित्रपट मोठ्या पडद्यावर, अजय शर्मा मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT