कोकण

सावंतवाडीत ४० ग्रॅम गांजा जप्त, संशयित ताब्यात

CD

98357

सावंतवाडीत ४० ग्रॅम गांजा जप्त, संशयित ताब्यात
सावंतवाडी, ता. १३ ः गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. जावेद पीरसाब शेख (वय ३८, रा. मोरडोंगरी) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ४० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोरडोंगरी येथील जावेद शेख हा आपल्या घराच्या अंगणात, पाण्याच्या टाकीजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास गांजा विक्रीसाठी थांबलेला आहे, अशी गोपनीय माहिती पोलिस विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक खंदरकर, हवालदार प्रवीण वालावलकर, श्री. राऊत आणि मंगेश शिंगाडे यांच्यासह एका विशेष पथकाने तातडीने कारवाईची योजना आखली. ​पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावर सापळा रचला. खात्री झाल्यावर पथकाने संशयित जावेद शेख याला ताब्यात घेऊन त्याची झाडाझडती घेतली. त्याच्या घराचा परिसर आणि घराचीही कसून झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये सुमारे संशयिताकडे ४० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.
​गांजा हा अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार प्रतिबंधित असल्यामुळे पोलिसांनी तातडीने पंचनामा करून जप्त केलेला गांजा आणि संशयितास पोलिस ठाण्यात आणले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे समजते. ​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT