कोकण

शेती नुकसानीपोटी १३ लाख ८६ हजाराची मदत

CD

शेती नुकसानीपोटी १३ लाखांची मदत
जून, जुलैमधील आपत्ती ; शेतकऱ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती-बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील जून आणि जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांसाठी १३ लाख ८६ हजार रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नैसर्गिक आपत्तीमधील पीक नुकसान अहवालानुसार जिल्ह्यातील ३०७.४१ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे ४६ लाखांचा फटका शेती-बागायतीला बसला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाला. मात्र काहीवेळा अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. त्याचा फटका सर्वाधिक भातशेतीला बसला आहे. जिल्ह्यातील २ हजार ५१७ शेतकरी बाधित आपत्तीमध्ये झालेले आहेत. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदतीची रक्कमही प्राप्त झाली आहे. जून २०२५ मध्ये झालेल्या नुकसानीसाठी १२ लाख ९६ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. तर जुलै २०२५ मधील नुकसानीसाठी ९० हजार रुपये प्राप्त झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने ही मदत वाटप करून त्यांना मदत करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे.
----
नुकसानीचा तपशील ः

महिना* क्षेत्राचे नुकसान (हेक्टर)* रक्कम (रूपये)* बाधित शेतकरी
एप्रिल* १३.३५* ३ लाख ४ हजार* ३०
मे* २६.६६* ७ लाख ७ हजार* १५३
जून* ७१.५४* १२ लाख ९६ हजार* ५६०
जुलै* ३.१३* ९० हजार* ४२
ऑगस्ट* ८८.८५* ८ लाख ९१ हजार* ५७९
सप्टेंबर* १०३.८८* १३ लाख ५२ हजार* १ हजार १५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT