कोकण

राजापूर- राजापूर तालुक्यात १९ हेक्टरवर बांबू लागवड

CD

rat२८p१०.jpg-
००९५३
राजापूर ः बांबू लागवड.

राजापूर तालुक्यात १९ हेक्टरवर बांबू लागवड
५०५ हेक्टरचे उद्दिष्ट ; कमी खर्चात अधिक उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी राजापूर तालुक्यात प्रभावीपणे सुरू आहे. यंदा फळबाग लागवडीसोबत बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय पंचायत समिती कृषी विभागाने केला आहे. तालुक्यासाठी ५०५ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान पाच हेक्टरवर बांबू लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आतापर्यंत४४ हेक्टरचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी १९.०८ हेक्टरवर बांबू लागवड झाली आहे. त्यावर ८ लाख ६० हजार ८०८ रुपये खर्च झाला आहे.
गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींसाठी उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, प्रथमेश पाटील, प्रदीप सावंत ग्रामपंचायतींसह शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी बांबू लागवड करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पंचायत समिती कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. बेरोजगारांच्या हाताला काम देताना त्याला किमान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत बांबू लागवडीचा समावेश केला आहे. बांबू लागवडीद्वारे शेतीच्या जोडीने शेतकर्‍यांना उपजीविकेचे नवीन साधनही उपलब्ध होत असून, त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कमी श्रमात अधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या बांबू लागवडीच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम अन् आर्थिक प्रगती साधली जात असताना पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासही मदत होणार आहे, असे आपटे यांनी सांगितले.
-----
चौकट १
बांबूची वैशिष्ट्ये...
* बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार
* जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते
* लवचिक व दणकट गुणधर्मामुळे बांबूला महत्व
* लागवडीनंतर नियमितपणे उत्पन्न सुरू
* देखभालीसाठी खर्च कमी मात्र, उत्पादन जादा
* बांबूला औद्योगिकदृष्ट्या महत्व
* बांबूचा बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्यांसाठी उपयोग
* कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि ऑक्सिजनवाढीसाठी बांबूची मदत
* जमिनीची धूप थांबण्यासह गुणवत्ता सुधारण्यास मदत
* पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने उपयुक्त
--------
चौकट २
दृष्टिक्षेपात लागवड
* उद्दिष्ट ः ५०५ हेक्टर
* प्राप्त प्रस्ताव ः ४४. ३४ हेक्टर
* मंजुरी प्राप्त प्रस्ताव ः १९.५८ हेक्टर
* लागवड झालेले क्षेत्र ः १९.०८ हेक्टर
* एकूण खर्च ः ८ लाख ६० हजार ८०८ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

SCROLL FOR NEXT