-rat३०p१८.JPG-
२५O०१३७९
खेड ः पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
----
पावसाने पुन्हा घातला भातशेतीवर घाव!
खेड तालुक्यातील ९३.०४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान ; ५०८ शेतकऱ्यांना फटका
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३० : तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत.
तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे; मात्र सप्टेंबर अखेरपासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपीक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून, नवीन पंचनामे तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसामुळे भाताचे पीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेल्या भातपिकाला नवीन कोंब आले आहेत. या परिस्थितीत उत्पादनात ५० टक्क्यापर्यंत घट होऊ शकते. दरम्यान, अजूनही तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या सरी सुरू आहेत. पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
चौकट
खेडमधील नुकसान ः
क्षेत्र* लाभार्थी* गावे
६२.२३* ३८९* २५
३०.८१* ११९* २०
-------------
९३.०४* ५०८* ४५
----
कोट १
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हवामान स्थिर झाल्यानंतर अचूक आकडे निश्चित करून शासनाकडे अहवाल पाठवला जाईल. येत्या चार दिवसांत नुकसानीचा अहवाल पूर्ण होईल.
- रवींद्र माळी, तालुका कृषी अधिकारी
-------
कोट २
गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटातून शेतकरी सावरणे कठीण आहे. या परिस्थितीत शासनस्तरावरून मदत मिळणे आवश्यक आहे.
- प्रमोद हुमणे, शेतकरी, मुरडे
------
दृष्टिक्षेपात
बाधित गावे* ४५
नुकसानग्रस्त शेतकरी* २४५
बाधितांना भरपाई* ४ लाख ८८ हजार ७५५ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.