swt516.jpg
02596
मालवणः राजकोट किल्ल्यालगतच्या जागेत असलेल्या ब्रिटिशकालीन स्मारकांची तोडफोड केलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले.
स्मारक तोडफोडप्रकरणी कारवाई करा
किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीः मालवण तहसीलदार, पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ : शहरातील राजकोट मेढा येथील ब्रिटिशकालीन पुरातन स्मारक तोडफोड प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार तसेच मालवण पोलिस ठाण्यास देण्यात आले.
किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरू राणे, इतिहास संशोधिका डॉ. ज्योती बुवा तोरसकर, हेमंत वालकर यांच्यासह अन्य सदस्यांनी आज तहसीलदार झालटे यांची भेट घेत निवेदन सादर केले. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती गेली पंधरा वर्षे सिंधुदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धनासाठी जनजागृतीचे काम करत आहे. यासाठी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. सिंधुदुर्गमधील हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी दरवर्षी देशविदेशांतून लाखो पर्यटक येतात. येथील राजकोट मेढा या भागात ब्रिटिशांनी १८२० मध्ये जहाज अपघातात मरण पावलेल्या ब्रिटिश सार्जंट जॉन गार्वेन, कमांडिंग कर्नल रॉबर्ट वेब तसेच त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधले आहे. त्यात दोन स्तंभ आणि एका कबरीचा समावेश आहे. कोणीतरी अनोळखी व्यक्तीने त्यांची तोडफोड केल्याचे आढळून आले आहे. त्या स्मारकांवर असणाऱ्या संगमरवरी पाट्याही काढून टाकल्या आहेत. अशी स्मारके ही इतिहास संशोधनाची साधने असतात. तसेच अशा साधनांमधून पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’चा आनंद घेता येतो.
या घटनेमुळे विद्यार्थी, इतिहास संशोधक, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. म्हणूनच असे कृत्य करणाऱ्यांचा छडा लावून त्यांच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी. तसेच स्मारकातील काढून टाकण्यात आलेल्या संगमरवरी पाट्या त्वरित ताब्यात घेण्यात याव्यात. इतिहास आणि पर्यटनाला बाधा आणणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी या घटनेचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंतीही किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनाही पाठविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.