kan61.jpg
02825
हिंगणगाव बुद्रुक ः येथे गोपुरी आश्रमातर्फे सौरकंदील वितरण करण्यात आले.
-------------
धाराशिवमधील विद्यार्थ्यांना
गोपुरी आश्रमातर्फे मदत
कणकवली, ता. ६ : धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सौर कंदिलांचे वाटप गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले. यंदाच्या अवकाळी पावसाने राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. या जिल्ह्यातील काही पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गोपुरी आश्रमातील सदस्यांनी एकत्र येऊन ७५ हजार रुपयांचा निधी एकत्र केला.
या निधीतून धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा, हिंगणगाव बुद्रुक, देवगाव खुर्द, आवार पिंपरी आणि शाळा लाकीबुकी या चार शाळांतील १५० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सौर कंदिलाचे वितरण करण्यात आले. या परिसरातील नागरिकांसमोर विजेचा प्रश्न होता. या करिता सौर कंदिलांचे वाटप केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, ही संकल्पना समोर ठेवून सौर कंदील वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोपुरी आश्रमातर्फे देण्यात आली. सौर कंदील वितरणावेळी गोपुरी आश्रमाचे मोहनराव सावंत, विनायक उर्फ बाळू मेस्त्री आणि मनोज सावंत, परेश परुळेकर उपस्थित होते.