परप्रांतीय तरुणाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः खानावळीत काम करताना अस्वस्थ वाटू लागलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. गज्जू राममिलन कोल (वय ३९, रा. विद्यालयाच्या शेजारी, पो. पैपखरा वैकुंठपूर, जि. रिवा, मध्यप्रदेश. सध्या रा. निवळी हातखंबा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) सकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गज्जू कोल हे बुधवारी सकाळी उठून खानावळीमध्ये काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी योगेशकुमार बिपिनचंद्र समदानी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
‘त्या’ संशयिताला
अटकपूर्व जामीन
रत्नागिरी ः शहराजवळील खेडशी येथील देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला न्यायालयाने ५० हजाराच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. सलमान नजमुद्दीन मुकादम (वय ३०, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील इतर संशयितांना न्यायालयाकडून जामीन मिळताच सलमानने सत्र न्यायालयापुढे अटकपूर्वसाठी दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. खेडशी येथे १३ मे २०२५ रात्रीच्या सुमारास पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. देहव्यापार करणाऱ्या चार महिलांसह संशयित अरमान खान याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.