कोकण

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घेतले मातोंड सातेरीचे दर्शन

CD

swt71.jpg
02961
मातोंडः येथील श्री देवी सातेरीचे विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहूल नार्वेकर यांनी सहकुटुंब दर्शन घेतले.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी
घेतले मातोंड सातेरीचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ः महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी मातोंड येथील श्री देवी सातेरीचे सहकुटुंब उपस्थित राहून यंदाही देवीचे दर्शन घेतले. राज्यातील बळीराजावर आलेले संकट दूर करावे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना जनतेची निःस्वार्थ व प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी सद्बुद्धी आणि ताकद द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
अॅड. नार्वेकर यांचे कुटुंब आणि मातोंड गाव यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मातोंडची ग्रामदेवता श्री देवी सातेरी हीच त्यांची कुलदेवता असल्याने नार्वेकर कुटुंबीय अनेक वर्षांपासून येथे दर्शनासाठी येतात.
मातोंड गावाच्यावतीने अॅड. नार्वेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सुरेश नार्वेकर, हिरोजी (दादा) परब, आनंद परब, उदय परब, सुधाकर परब, तुकाराम परब, रविकिरण परच, दिगंबर परब, सुनील परब, दादा म्हालटकर, अभय परब, दीपक परब, नितीन परब, दीपेश परब, ज्ञानेश्वर केळजी, एम. जी. मातोंडकर, आनंद इंगळे, सागर परब, महेश वडाचेपाटकर, सुधीर मातोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. राहुल नार्वेकर यांनी, गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या कुटुंबाची मातोंड गावाशी घट्ट नाळ आहे. मातोंडच्या सातेरी देवीवर आमची नितांत श्रद्धा आहे. ती आमची कुलदेवता आहे. त्यामुळे कोकणची लाल माती आम्हाला येथे नेहमी खेचून आणते. दरवर्षी मातोंडच्या जत्रोत्सवाला आमचे कुटुंब उपस्थित असते. येथे आल्यानंतर मनाला समाधान आणि शांती मिळते, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: जिल्हा परिषद निवडणुकांची लवकरच घोषणा!

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

SCROLL FOR NEXT