- rat७p१.jpg-
२५O०२९३४
रत्नागिरी ः तालुक्यातील कुर्धे येथे अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या निवासी शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थी.
---
ऋग्वेद भोंडवलकर, वेदांगी नागले आदर्श स्वयंसेवक
अभ्यंकर-कुलकर्णीचे श्रमसंस्कार शिबिर; गणेशगुळे किनाऱ्याची केली स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ ः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर कुर्धे येथील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर येथे झाले. यामध्ये ऋग्वेद भोंडवलकर आणि वेदांगी नागले हे आदर्श स्वयंसेवक ठरले आहेत. या शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी गणेशगुळे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करत श्रमदान केले.
श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपावेळी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, शाळेचे माजी मुख्याध्यापक उदय फडके, प्रा. अभिजित भिडे, प्रा. सुनील भोईर, प्रा. भूषण केळकर, प्रा. वैशाली यादव, प्रा. रिद्धी हजारे तसेच ग्रामस्थ व प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने व दीपप्रज्वलनाने झाली. प्रा. भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी मुख्याध्यापक फडके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या श्रमदानाचे आणि शिस्तीचे कौतुक केले. ग्रामस्थ, सरपंच व शिक्षण सुधारक समितीने शिबिरादरम्यान झालेल्या अवकाळी पावसातही शिबिरार्थींची काळजी घेऊन केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल उपप्राचार्य गोसावी यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साखळकर यांनी मुलांनी विविध ठिकाणी केलेल्या स्वच्छताकामांचे विशेष कौतुक केले.
या शिबिरात प्रश्नमंजुषा, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, गटशः कौशल्य सादरीकरण, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गट व शिबिरार्थींना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले व पुढीलप्रमाणे बक्षिसे देण्यात आली. आदर्श स्वयंसेवक - ऋग्वेद भोंडवलकर, वेदांगी नागले, पथनाट्य स्पर्धा विजेता-वृंदावन गट, डॉजबॉल विजेता-बाजीगर गट, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा-अनन्या गोरे ( प्रथम), वैष्णवी कांबळे (द्वितीय), ऋग्वेद ठाकूर (तृतीय). सर्वोत्कृष्ट श्रमदान-सार्थक कदम, मैथिली पवार, अष्टपैलू शिबिरार्थी-ऋग्वेद ठाकूर, दीक्षा मोहिते, सर्वोत्कृष्ट गटनेता- पर्णवी देसाई, आदर्श मार्गदर्शक-हिंदवी कीर, सर्वोत्कृष्ट गट-बाजीगर गट सर्व विजयी स्वयंसेवकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या शिबिरांतर्गत श्रमसंस्कारातून गणेशगुळे समुद्रकिनारा स्वच्छता, सर्वेश्वर व महाविष्णू मंदिर व शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रिद्धी हजारे व आभार प्रा. वैशाली यादव यांनी मानले.
चौकट
विविध कार्यशाळांचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकास साधनेच्या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पथनाट्य कार्यशाळा सुरेंद्र जाधव, सूत्रसंचालन कार्यशाळा प्रा. सुप्रिया टोळये, व्यंगचित्र कार्यशाळा योगेश हातखंबकर, कथाकथन कार्यशाळा जयंत फडके तसेच डॉ. अक्षय फाटक यांनी ‘सायबर संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन केले. महिला मेळावा व महिला आरोग्य-शारीरिक व मानसिक काळजी या विषयावरती प्रा. क्षमा पुरस्कार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.