- rat७p८.jpg-
२५O०२९५१
राजापूर नगरपालिका
---
इच्छुकांच्या भाऊगर्दीने बंडखोरीची शक्यता
राजापुरात नगरपालिका निवडणूक; सर्वच राजकीय पक्षांची सावध पावले
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः नगरपालिका निवडणुकीसाठी राजापूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीबाबत संभ्रमावस्था असली तरीही शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या नाराजीतून बंडखोरी उफाळून येऊन त्याचा राजकीय पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या हिरवा कंदील मिळालेल्या उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे तर, उर्वरितांची घालमेल वाढलेली आहे.
राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. राजापूरमध्ये १० प्रभागातील २० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करताना पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर नगराध्यक्षपदही महिलांसाठी आरक्षित आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या आरक्षणाप्रमाणे उमेदवारी निवड करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत. चार वर्षानंतर या निवडणुका होत असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. जिथे महिला आरक्षण आहे तिथे नेत्यांकडून पत्नीची वर्णी लावण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करताना दिसत आहेत. ही स्थिती असली तरीही महाविकास आघाडी वा महायुती निश्चितीसाठी मित्रपक्षांच्या बैठका होत नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे.
महाविकास आघाडी वा महायुती होण्याचे संकेत मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दिले जात आहेत. महाविकास आघाडी वा महायुतीच्या अधिकृत शिक्कामोर्तब झाल्यानंतर, जागावाटप आणि उमेदवारी निश्चिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी वा महायुतीमध्ये जागावाटपामध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे. त्यानंतर, आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर उमेदवार निवड करताना मित्रपक्षांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्याच्यातून रंगणाऱ्या नाराजी नाट्यातून बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---
कोट
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून नगरपालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे निवडणूक लढवण्यात येणार आहे. लवकरच महायुतीतील मित्रपक्षासमवेत बैठक होऊन निर्णय होईल.
- मोहन घुमे, तालुकाध्यक्ष, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.