rat9p14.jpg
03372
रत्नागिरी ः कॅरम खेळताना ओम पारकर.
--------
रत्नागिरीच्या ओम पारकरची चौथ्या फेरीत धडक
राज्य कॅरम स्पर्धा ; रियाझ अकबर अली विजयी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ९ः महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने प्रदीप परचुरे आणि कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर आयोजित गुहागर येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटामध्ये रत्नागिरीचा ओम पारकर चौथ्या फेरीत दाखल झाला आहे.
गुहागर येथील भंडारी भवनात सुरू असलेल्या या राज्य स्पर्धेत पुरुष एकेरी गटात रत्नागिरीच्या ओम पारकरने ठाण्याच्या कुणाल राऊतवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २०-१८, १६-१५ व २०-८ असा पराभव करत चौथी फेरी गाठली. तर रत्नागिरीच्याच योगेश कोंडविलकरने पुण्याच्या आयुष गरुडाला सरळ दोन सेटमध्ये १६-६, १८-१० असे नमवून आगेकूच केली. तिसऱ्या फेरीचे इतर निकाल असे ः झैद अहमद फारुकीने (ठाणे) मंगेश कासारेवर २५-४, २५-० असा पराभव केला. राजेश गोहिलने (रायगड) सुरज कुंभारचा ( मुंबई ) १९-१४, २५-० गुणांनी, पंकज पवारने (ठाणे) विजय पाटील (मुंबई उपनगर) २५-५, २५-० गुणांनी, हितेश कदमने (मुंबई उपनगर) राहुल भस्मेचा (रत्नागिरी) २४-११, १३-२३, २५-१४ गुणांनी पराभव केला. समीर अंसारीने (ठाणे) सुदेश वाळकेचा (मुंबई उपनगर) २५-६, २५-४ गुणांनी, रियाझ अकबर अली (रत्नागिरी) विलास आंबवलेचा (ठाणे) २५-०, २५-८ गुणांनी, अमोल सावर्डेकरने (मुंबई) हेमंत पांचाळचा (मुंबई) २५-१५, १७-९ गुणांनी, दिनेश केदारने (मुंबई) ब्लेसिंग सामीचा (ठाणे) २५-३, २५-१ गुणांनी, सागर वाघमारेने (पुणे) सुजित जाधवचा (रत्नागिरी) २५-५, २५-१ गुणांनी, ओमकार टिळकने (मुंबई) अब्दुल हमीदचा (रायगड) २५-०, २५-० गुणांनी, रवींद्र हंगेने (पुणे) आशिष सिंगचा (मुंबई उपनगर) १८-२०, २४-९, २५-१ गुणांनी, विश्वजित भावेने (ठाणे) जोनाथन बोनलचा (पालघर) २५-९, २५-९ गुणांनी पराभव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.