कोकण

खड्डे बुजवून निद्रीस्त शासनाला चपराक

CD

03506

खड्डे बुजवून निद्रीस्त शासनाला चपराक

‘अष्टविनायक’चे कार्य; मळगाव बाजारपेठ रस्ता झाला निर्धोक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेला लाजवेल, असे कार्य मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले. सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव बाजारपेठेतील शारदा विद्यालयासमोर गतिरोधकाजवळ रस्त्यावर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. ७) श्रमदानातून मध्यरात्री स्वखर्चाने हे खड्डे सिमेंट-काँक्रिटने बुजविले. शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजन व सामाजिक कार्याची सांगड घालणाऱ्या अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्या या कार्याचे वाहनधारक व ग्रामस्थांनी कौतुक केले.
सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव बाजारपेठ येथे शारदा विद्यालयासमोर असलेल्या गतिरोधकाशेजारी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांबाबत मॉन्सूनच्या पावसापूर्वीच वृत्त प्रसिद्ध झाले होते; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांची अवस्था अधिकच बिकट झाली. चिखलमय व खड्डेमय रस्त्यावरून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. येथे मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात येता पुढील धोका टाळण्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून रस्त्यावरील हे खड्डे बुजविण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तयारीत होते, पण वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे अडथळे येत होते. आता पावसाचा जोर ओसरताच, सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठल्याही प्रकारची वाट न बघता दिवसा वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी मंडळाने शुक्रवारी (ता. ७) एका रात्रीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले.
---
मंडळातील सदस्यांचे कौतुक
मळगाव येथील सत्ताधारी व विरोधकांकडूनही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता वाखणण्याजोगे काम मंडळाने केल्याने ग्रामस्थ व वाहनधारकांनी मंडळाचे कौतुक केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी हे खड्डे डांबरीकरण करून बुजवावेत, अशी मागणी मंडळाने केली. या श्रमदानात मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, सचिव उदय फेंद्रे, खजिनदार संदेश सोनुर्लेकर, सल्लागार सचिन सोनुर्लेकर, सदस्य संजय धुरी, स्वप्नील नार्वेकर, उमेश कोंडये, ज्ञानेश्वर राणे, संदीप तेंडोलकर, नीलेश चव्हाण आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

Delhi Blast : दिल्लीत २९ वर्षांत किती वेळा झाले स्फोट? संपूर्ण माहिती वाचा एका ठिकाणी

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : गृहमंत्री अमित शहा यांनी आयबी प्रमुखांकडून घेतली माहिती

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

SCROLL FOR NEXT