swt133.jpg
04120
कुडाळः राजेंद्र तेरसे यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सन्मान केला, यावेळी हणमंतराव गायकवाड, आमदार दीपक केसरकर, मोहन होडावडेकर, नकुल पार्सेकर, आनंद बांदिवडेकर, शशी चव्हाण आदी. (छायाचित्रः अजय सावंत)
''विनायक व्हिल्स''चे तेरसे
यांचा कुडाळ येथे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः येथील श्री विनायक व्हिल्स प्रा.लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र तेरसे यांना वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये श्री विनायक व्हिल्स प्रा.लि. ने जगातील टॉप बँड सुझुकी मोटरसायकल इंडियाच्या देशभरातील डिलरमधून राष्ट्रीय स्तरावर उपविजेतेपद मिळाल्याबद्दल एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ही डीलर कॉन्फरन्स नुकतीच पवई स्थित दी वेस्टिन हॉटेल, मुंबई येथे आयोजित केली होती. श्री. तेरसे यांना सुझुकी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. केनिची उमेडा सान यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या या गौरवाबद्दल उद्योगमंत्री सामंत, भारतीय विकास ग्रुपचे उद्योजक हणमंतराव गायकवाड, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव अॅड. नकुल पार्सेकर, माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, कौसर खान, अमित वळंजू, शशी चव्हाण, संजीवकुमार प्रभू, सीए सुनील सौदागर, अॅड. अजित भणगे, राजू तेर्से, राजीव पवार, मंगेश तेरसे, एम. के. गावडे, प्रज्ञा परब, सचिन मदने, गणेश म्हाडदळकर, योगेश नाडकर्णी, राज चव्हाण आदींसह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.
....................