कोकण

रत्नागिरी-अभिवाचन स्पर्धेत तीर्था, सेजल, रमा, आर्या प्रथम

CD

rat11p13.jpg-
04366
रत्नागिरी : सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमांतर्गत आयोजित अभिवाचन स्पर्धेचे उद्घाटन करताना शुभांगी दामले.
---------

लोगो.... सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम

अभिवाचन स्पर्धेत तीर्था, सेजल, रमा, आर्या प्रथम
खुल्या गटात हर्षाली केळकर, पूर्वा खालगावकर विजेत्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : लेखिका सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमांतर्गत काव्य अभिवाचन स्पर्धेत शालेय गटात तीर्था मयेकर, महाविद्यालयीन गटात सेजल मेस्त्री, खुल्या गटात हर्षाली केळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर गद्य अभिवाचन स्पर्धेच्या शालेय गटात रमा कानविंदे, महाविद्यालयीन गटात आर्या वंडकर आणि खुल्या गटात पूर्वा खालगावकर यांनी बाजी मारली. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग आणि आर्ट सर्कल आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाचे उद्घाटन काव्य अभिवाचन स्पर्धेने झाले. प्रसिद्ध अभिनेत्री आणि समांतर रंगभूमीच्या चळवळीतील ज्येष्ठ कलाकार शुभांगी दामले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या दोन्ही स्पर्धा सुनीताबाईंची शाळा असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये पार पडल्या. या उद्घाटनप्रसंगी भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, परीक्षक आणि डॉ. मेधा गोंधळेकर उपस्थित होत्या. शालेय, महाविद्यालयीन आणि खुला अशा तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित, बालनाट्य चळवळीतील डॉ. राजेंद्र चव्हाण, अभिनेता स्वानंद देसाई आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले.
स्पर्धा दोन दिवस झाली. यात पहिल्या दिवशी शुभांगी दामले यांनी आहे मनोहर तरी मधील काही भागांचे अभिवाचन केले. दुसऱ्या दिवशी परीक्षक वामन पंडित यांनी अभिवाचन करून स्पर्धेची सांगता केली. याच दिवशी स्वा. सावरकर नाट्यगृहात पु. ल. देशपांडे लिखित मॅड सखाराम आणि मुकेश माचकर लिखित मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास असे दोन दीर्घांक सादर झाले. उपक्रमात दुसऱ्या दिवशी जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई यांचा पत्राद्वारे झालेल्या संवादाचे अभिवाचन लेखिका, गायिका, अभिनेत्री माधुरी पुरंदरे आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी केले.

चौकट १
स्पर्धेचा निकाल असा
काव्य अभिवाचन स्पर्धा: शालेय गट: प्रथम- तीर्था मयेकर, द्वितीय- तीर्था नाखरेकर आणि तृतीय आरोही पवार. महाविद्यालयीन गट: प्रथम- सेजल मेस्त्री, द्वितीय-श्रीया केळकर, तृतीय आर्या वंडकर. खुला गट: प्रथम- हर्षाली केळकर, द्वितीय मानसी चव्हाण, तृतीय योगिनी भागवत आणि उत्तेजनार्थ पूर्वा साने. गद्य अभिवाचन स्पर्धा : शालेय गट: प्रथम- रमा कानविंदे, द्वितीय- प्रत्युष पेठे आणि तृतीय स्वराली टापरे. महाविद्यालयीन गट: प्रथम- आर्या वंडकर, द्वितीय- सिद्धी रानडे, तृतीय मेघा पेंडसे. खुला गट: प्रथम- पूर्वा खालगावकर, द्वितीय- दीप्ती पंडित, तृतीय- आभा घाणेकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

Jalgaon : अंत्यसंस्काराला गेलेल्यांवर मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसाच सोडून पळाले; १० जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : गॅस तुटवड्यावर तोडगा न निघाल्यास ठाण्यातील ७० टक्के हॉटेल्स बंद होणार

Gold Investment Returns : सोने गुंतवणुकीने दोन महिन्यांत तब्बल 28 हजारांचा परतावा; इराण-अमेरिका युद्धानंतरही भावात घसरण, सुवर्ण बाजारात अस्थिर वातावरण

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! MCX बाजारात दर घसरले; आज 1 तोळा सोनं कितीला?

SCROLL FOR NEXT