कोकण

दापोली-हर्णे रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळणार का

CD

rat14p15.jpg-
04377
दापोली ः हर्णै मुख्य मार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकीचालकांना अशी कसरत करावी लागते.
----------
हर्णै रस्त्याची दुरवस्था पर्यटनाच्या मुळावर
दुरूस्तीकडे दुर्लक्ष ; खड्ड्यांमुळे वाहने चालवण्याची कसरत
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ : दापोली-हर्णै या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवाळी पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी मार्गावर रेलचेल असते. रस्त्याची दयनीय अवस्था पाहून नागरिकांसह प्रवाशांमधून उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा संपूनही दुरूस्तीच्या कोणत्याही ठोस हालचाली सुरू न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दापोली तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी मुरूड, कर्दे, हर्णै, पाळंदे, आंजर्ले, केळशी या सर्व प्रमुख किनारी भागांतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची कसरत सुरू झाली आहे. विशेषतः सालदुरे, आसुद आणि हर्णै मार्गावरील खोल खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. बुरोंडीनाका भागातील खड्डे वाचवताना दुचाकी व चारचाकी वाहनांची तारांबळ उडते. अनेक दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण गेल्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांचे नुकसान, टायरची झीज आणि अनावश्यक खर्चामुळे लोक त्रस्त झाले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. अलीकडे केलेल्या डागडुजीतील खड्डे काही दिवसांतच पुन्हा उघडे पडल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरवर्षी पावसाळ्यानंतर सतत खड्ड्यांविषयी तक्रारीचा पाढा नागरिकांना वाचावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती कायमच गंभीर असल्यामुळे गोंधळात भर पडत आहे. पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डे भरण्याच्या कामास सुरवात होईल, असे सांगण्यात आले; मात्र नोव्हेंबर महिन्याचा पंधरवडा उलटूनही प्रत्यक्षात कोणताही बदल दिसत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. दापोली-हर्णै हा केवळ पर्यटनमार्ग नसून, स्थानिक व्यवसाय, मच्छीमार बंदर आणि दैनंदिन वाहतुकीसाठीही अत्यंत महत्त्वाचा असल्याने तातडीने गुणवत्तापूर्ण दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी सर्वसाधारण मागणी होत आहे.

कोट
दररोज या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून करावा लागतो. खड्ड्यामुळे दुचाकी घसरते, चारचाकी वाहने खड्ड्यात आपटतात, पाठदुखी होते तरीही प्रशासनाला काहीच फरक पडत नाही.
- युवराज भुवड, नागरिक

कोट २
पर्यटक येतात; पण रस्त्यांची अवस्था पाहून ते परत जाताना नाराजी व्यक्त करतात. याचा थेट परिणाम आमच्या पर्यटन व्यवसायावर होत आहे.
- दिग्विजय जाधव, व्यावसायिक, हर्णै

चौकट १
बांधकाम विभागाला पत्र
दापोली-हर्णै मुख्य रस्त्याची प्रचंड खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असल्याचे स्थानिक नागरिकांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून दिले असता काल (ता. १३) सार्वजनिक बांधकामखात्याला दापोली-हर्णै मुख्य रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करून द्यावी, असे पत्र दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Bihar Election Result 2025 Updates : बिहारमध्ये एनडीएने डबल सेंच्युरी ठोकली, महाआघाडीचा पराभव, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Latest Update News Marathi: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT