कोकण

वाकलेला विद्युत खांब घरासाठी ठरतोय धोकादायक

CD

rat16p10.jpg-
04681
रत्नागिरी ः तालुक्यातील शिवारआंबेरे हातिसकरवाडी येथे मोडकळीस आलेला विद्युत खांब.
rat16p11.jpg

रत्नागिरी ः खाली आलेल्या विद्युत वाहिन्या तुटण्याची शक्यता आहे.
04682


वाकलेला विद्युत खांब घरासाठी धोकादायक
शिवारआंबेरे होतिसकरवाडीतील प्रकार; तक्रारीकडे महावितरणचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे हातिसकर वाडी येथील अभिमन्यू मयेकर यांच्या घराजवळ विद्युत कंपनीचा लोखंडी खांब धोकादायक बनला असून मुख्य वाहिनीखाली आल्यामुळे त्यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. याविषयी विद्युत कंपनीला वारंवार पत्र देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तेथील लोखंडी विद्युत खांब व वाहिनी घरावर पडण्याची शक्यता आहे, तरी खांब तातडीने बदलावा अशी मागणी अभिमन्यू मयेकर यांनी महावितरणकडे केली आहे.
हातिसकर वाडी येथे राहणाऱ्या श्री. मयेकर यांच्या घराजवळ विद्युत कंपनीची मुख्य विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी घराजवळून जाते. तिथे असलेला लोखंडी विद्युत खांब पूर्णपणे वाकलेला आहे. त्यामुळे मुख्य वाहिनी खाली आली असून त्या परिसरातून ये-जा करणाऱ्यांना धोका निर्माण झालेला आहे. पूल तुटल्यानंतर त्या परिसरातील लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मयेकर यांनी महावितरणच्या कार्यालयासह पालकमंत्र्यांना ६ महिन्यापूर्वी निवेदन दिले होते. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही विचारणा केली होती. परंतु कोणतेही उत्तर दिले गेलेले नाही. याबाबत सतत पाठपुरावा करूनही संबंधित खात्याने फक्त सिमेंटचा खांब आणून ठेवलेला आहे. संबंधित कंपनीने सूचना न केल्यामुळे ठेकेदाराने अद्याप विद्युत खांब बदललेला नाही. मुख्य वाहिनी असल्याने तिथे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तरी तातडीने विद्युत खांब बदलण्यात यावा अशी मागणी केली आहे.


कोट
माझ्या घराजवळ मुख्य विद्युत वाहिनी जात असून तेथील लोखंडी खांब वाकल्यामुळे विद्युत वाहिन्या पूर्णपणे खाली आलेल्या आहेत. याविषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं दिली आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संबंधित अधिकारी डोळे झाकून राहत असल्यामुळे भविष्यात आम्हाला धोका पोहोचु शकतो.
- अभिमन्यू मयेकर, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT