कोकण

चिपळूण-कुंभार समाजाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

CD

ratchl१६२.jpg-
04764
चिपळूण ः शिबिरात मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे.
------------
कुंभार समाजाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
चिपळूण, ता. १६ ः येथील संत गोरा कुंभार विकास मंडळ व संत गोरा कुंभार युवा आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला समाजबांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. समाजातील युवकांसह ज्येष्ठांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले.
जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या सहकार्यातून कुंभार समाजाच्या खेर्डी येथील संस्कार व्हॅली इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयमच्या सभागृहात रविवारी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संत गोरा कुंभार विकास मंडळ तसेच युवा आघाडीच्या वतीने समाजाच्या प्रगतीसाठी सातत्यने विविध उपकमांचे आयोजन केले जाते. समाजासाठी जिल्हाभरात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. समाजाच्या युवाआघाडीच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे कुंभार समाजाचे कोकण अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी संत गोरा कुंभार विकास मंडळाच्या विविध उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. या वेळी तालुका कार्याध्यक्ष रवी साळवी, उपाध्यक्ष दीपक शिरकर, अमोल पिरदनकर, सचिव प्रकाश कराडकर, पतसंस्था अध्यक्ष तुकाराम साळवी, उपाध्यक्ष तुकाराम टेरवकर, बबन पडवेकर, संचालिका सुमन साळवी, महिला तालुकाध्यक्षा स्वप्नाली कराडकर, राजेश्री टेरवकर, रवींद्र शिरकर, संचालक सुनील पडवेकर, अरविंद गुडेकर, अण्णा साळवी, युवा आघाडी अध्यक्ष दिनेश वहाळकर, उपाध्यक्ष मंगेश बुरबाडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टाचा आदेश; बलात्कार प्रकरणातील दोषी तरुण तेजपालला दोन आठवड्यांत शरणागती पत्करण्याचे निर्देश

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT