कोकण

गोगटे महाविद्यालयात फिजिक्स फेअर उपक्रम

CD

‘गोगटे’त फिजिक्स फेअर उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : शहरातील ११वी, १२वीच्या विद्यार्थ्यांकरिता गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे ‘कम अँड लर्न फिजिक्स-अ फिजिक्स फेअर’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा रत्नागिरी शहरातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
भौतिकशास्त्रातील काही मुलभूत संकल्पनांशी संबंधित प्रयोगांचे प्रदर्शन आणि करिअरच्या संधींविषयीची मार्गदर्शनपर सत्रे घेण्यात आली. विद्यार्थ्यांकरिता त्यांच्याच अभ्यासक्रमातील उपयुक्त माहिती देणारे विविध प्रयोग मांडण्यात आले. यामध्ये ऊर्जा, ध्वनी, मोजमाप साधने, प्रकाश, प्रकाशाचे ध्रुवीकरण, विवर्तन, दृश्यमान प्रकाश वर्णपट, विद्युत चुंबकीय परिणाम, पृष्ठताण, तरंग आणि अनुनाद, विद्युतधारा, खगोलशास्त्र तसेच संगणकावर आधारित प्रयोगांचा आणि प्रतिकृतींचा समावेश होता आणि यांचा वापर संकल्पना स्पष्ट करण्यासाठी करण्यात आला.
भौतिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील साधारण ३५ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगांची मांडणी केली आणि सोप्या भाषेत त्यांतील वैज्ञानिक तत्त्वे प्रयोगांसह समजावून सांगितली. प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे संकल्पना समजावून घेण्याचा उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. भौतिकशास्त्रातील करिअरच्या संधींविषयीच्या मार्गदर्शनपर सत्रात डॉ. किशोर सुखटणकर आणि डॉ. महेश बेळेकर यांचे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई-पुण्यात किती रुपये? तुमच्या शहराचा भाव पाहा

Gokul Dudh Sangh Dispute : 'गोकुळ' सुनावणीवरून दुग्ध विभागात गोंधळ; नोटिसीशिवाय सुनावणी म्हणजे अधिकाऱ्यांची हुकूमशाही, दूध उत्पादकांचा संताप

Marathi News Live Updates : गुरमीत राम रहीमला पुन्हा 21 दिवसांची फर्लो मंजूर; आतापर्यंत 17 वेळा आला तुरुंगाबाहेर

Mhasurli Clinic Inspection: खासगी दवाखान्यांत अनोळखींकडून पाहणी म्हासुर्लीत खळबळ ः महिला, पुरुषांचा समावेश; चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद

Sugar Prices Fall: साखर दरात घसरण; पण ग्राहक नाही; किरकोळ बाजारात मात्र महागच

SCROLL FOR NEXT