कोकण

कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज

CD

कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज
साहिल आरेकर ः राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे स्वतंत्र वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १७ ः महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेर पडलेली नाही; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात महायुती आहे त्याप्रमाणे गुहागरमध्येसुद्धा महायुती व्हावी, अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा होती. महायुतीतील सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये सुद्धा इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महायुतीच्या शर्यतीत प्रत्येकाला उमेदवारी मिळेल असे नाही. ज्या ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या प्रभागात जास्तीची ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्याचा असा अर्थ नाही की, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडलो; पण आमची तयारी सर्वदृष्टीने आहे. त्यामुळे नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नगराध्यक्षपदासाठी सुजाता बागकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे अशा पाच ते सहा जागांवर नगरसेवकपदांसाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरले आहेत. जरी आम्ही अर्ज भरले असले तरीसुद्धा उमेदवारी अर्ज पाठी घेण्याबाबत अद्यापही त्या पद्धतीची चर्चा झाली नाही. वरिष्ठ नेते जे निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी होणारी निवडणूक आम्ही लढवणार असलो तरी वरिष्ठ नेते जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल, असेही आरेकर यांनी सांगितले. या वेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुजाता बागकर, श्रीधर बागकर, दीपक शिलधणकर, संदीप शिलधणकर, तुषार सुर्वे व उमेदवार उपस्थित होते.

चौकट
महायुतीमध्ये चाललंय काय...?
गुहागर नगरपंचायत निवडणुकीत महायुतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय...? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात महायुती असली तरीही गुहागर नगरपंचायतीमधील राजकीय स्थिती वेगळीच आहे. भारतीय जनता पक्षाने एकूण १७ पैकी १४ जागांवर नगरसेवकपदांसाठी अर्ज दाखल केले आहेत तसेच शिवसेना शिंदेगटाने १७ पैकी ९ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजितदादा पवार गट) १७ पैकी ६ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवार अर्ज भरताना भाजप शिवसेना एकत्र जरी रॅलीमध्ये दिसून आले तरीसुद्धा पुढील काळामध्ये एकत्र राहतील की, नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. तरीसुद्धा अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत महायुतीमध्ये अनेक चर्चा होऊन महायुती म्हणून गुहागर नगरपंचायत निवडणूक लढवेल का, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: 'हिजाब घालणे' इस्लामिक श्रद्धेचा अनिवार्य भाग नाही; हायकोर्टाचा मोठा निकाल, याचिका फेटाळली

Gokul Election 2026 : 'गोकुळ' बिनविरोध होणार नाहीच! आमदार सतेज पाटील यांचा महायुतीला थेट इशारा, ताकदीने लढण्याची घोषणा

स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचताच सिद्धार्थ जाधव भडकला, म्हणाला...'कसली घाई आहे यांना...'

Marathi News Live Updates : राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे कसे?; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर निशाणा

Raju Shetti: ‘श्रीराम साखर कारखाना बंद पाडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रयत्न’; राजू शेट्टींचा गंभीर आरोप, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT