कोकण

जिल्ह्यात २ डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम

CD

-rat१७p१८.jpg-
२५O०४९५३
रत्नागिरी ः कुष्ठरोग शोधमोहीम जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल.
-------------
जिल्ह्यात २ डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोधमोहीम
मनुज जिंदल ः १,१५३ आरोग्यपथकं घरोघरी जाणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्ह्यामध्ये सोमवारपासून (ता. १७) कुष्ठरोग शोधमोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम २ डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. यासाठी १ हजार १५३ शोधपथके तयार करण्यात आली आहेत. आरोग्यपथकं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार असून, त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
कुष्ठरोग शोधमोहीम २०२५ जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, आरोग्यसेवा (कुष्ठरोग)चे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेझ पटेल, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे आदी उपस्थित होते. डॉ. आठल्ये आणि डॉ. पटेल यांनी संगणकीय सादरीकरण करून मोहिमेबाबत माहिती दिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, या मोहिमेची जनजागृती करा. जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी अर्थात् शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग काम करत आहे. या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्यपथकास सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घ्यावी. या पंधरवड्यात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करणार आहेत. यासाठी १ हजार १५३ शोधपथके तयार करण्यात आली आहेत. २३६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात एक आशा व एक पुरुष स्वयंसेवक असणार आहे. जिल्ह्यातील जोखीमग्रस्त व दुर्लक्षित भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कुष्ठरोग लक्षणांची ओळख व वेळेवर उपचार देणे, प्रसार रोखणे व सामाजिक भेदभाव दूर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, जनजागृतीसाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा तसेच कुष्ठरोगाची चिन्हे, लक्षणे, मोफत उपचार आणि समज-गैरसमज याबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. गावपातळीवर दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांना अभियानाची माहितीही दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

चौकट
कुष्ठरोगाची लक्षणे
* त्वचेवर फिकट किंवा लालसर बधीर चट्टा
* त्वचा जाड, तेलकट किंवा गाठीदार होणे
* कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे
* डोळे पूर्णपणे बंद करता न येणे
* तळहात व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा किंवा जखमा होणे
* हात व पायाची बोटे वाकडी होणे
* थंड-गरम संवेदना न जाणवणे
* हातातून वस्तू गळून पडणे
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Latest Marathi Breaking News : धक्कादायक! 16 वर्षीय भाचीला सख्या मामानं चालत्या लोकलमधून खाली ढकललं

SCROLL FOR NEXT